Sonalee Kulkarni SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीने स्वत:च्या हाताने घडवली बाप्पाची मूर्ती; गणेशभक्तांना दिला खास संदेश, पाहा VIDEO

Sonalee Kulkarni Ganpati : सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. तिने आपल्या हाताने गणेशाची सुरेख मूर्ती घडवली आहे. सुंदर व्हिडीओ पाहा.

Shreya Maskar

अनेक कलाकारांच्या घरी गणपतीचे (Ganesh Chaturthi) आगमन झाले आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे कलाकारांनी गाजत वाजत स्वागत केले आहे. नुकतेच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली (Sonalee Kulkarni) कुलकर्णी हिच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. तिने बाप्पाच्या आगमनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 'आमचे बाप्पा विराजमान झाले' असे सुंदर कॅप्शन अभिनेत्रीने दिले आहे. फोटोंमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मराठीसोबतच हिंदी, दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपली छाप उमटवली आहे. सोनाली उत्तम नृत्यांगना देखील आहे. आपल्या अदांनी ती चाहत्यांना घायाळ करते. महाराष्ट्राची अप्सरा अशी सोनालीची ओळख आहे. अशा अष्टपैलू अभिनेत्रीच्या घरी नुकतेच गणपतीचे आगमन झाले आहे.

सोनाली कुलकर्णी गणेशोत्सवासाठी दुबईवरून भारतात आलेली आहे. तिच्या घरातील गणपतीची विशेषता म्हणजे,दरवर्षी प्रमाणे यंदाही सोनालीने घरातील गणपतीची मूर्ती स्वतः घडवली आहे. स्वतःच्या हाताने गणेशाला आकार दिला आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर टाकला आहे. जो आता चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला सोनालीने 'यंदाचा बाप्पा …आमचा गणोबा'असं कॅप्शन लिहिलं आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली भावाच्या मदतीने बाप्पाची मूर्ती घडवताना दिसत आहे. या सुंदर मूर्तीमध्ये गणपतीसोबत छोटा उंदीर मामा आणि शंकराची पिंड दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. सध्या सोनाली कुलकर्णी 'होऊ दे चर्चा…कार्यक्रम आहे घरचा!' या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवानिमित्त सोनालीने सांगितले की, मी नेहमीप्रमाणे आपल्या भावासोबत मिळून स्वतः पर्यावरण पूरक गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे. पर्यावरण पूरक (Eco Friendly Ganpati Murti) गणेशोत्सव साजरा करताना सोनालीने महिलांवरील विघ्न दूर कर, महिलांना स्वातंत्र्यानं आणि सुरक्षित जगता यावं असा कायदा बनवा. असं साकडं सोनालीने विघ्नहर्ता कडे घातलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT