Ganesh Idol : 'या' टिप्सने घरच्याघरी बनवा गणपती बाप्पाची मूर्ती; माती कोणती वापरावी आणि खर्च किती येईल? वाचा सविस्तर

Ganesh Idol Making at Home : आम्ही आज सिंपल स्टेप्समध्ये तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती कशी बनवायची याची महिती सांगणार आहोत.
Ganesh Idol Making at Home
Ganesh Idol Saam TV
Published On

संपूर्ण भारतात ७ सप्टेंबर रोजी गणराया विराजमान होणार आहे. बाजारात गणपतीच्या अनेक मूर्ती विकण्यासाठी आल्या आहेत. यातील काही मूर्ती POP पासून बनवल्या जातात. POP पासून बनलेली मूर्ती विसर्जनावेळी पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे प्रदूषण सुद्धा वाढतं. आता असे केल्याने प्रदूशनात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे बऱ्याच व्यक्ती इको फ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणतात.

Ganesh Idol Making at Home
Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीला बनणार ४ शुभ योग; बाप्पाच्या स्थापनेची 'ही' आहे योग्य वेळ

गणपती बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती बाहेर ७ ते ८ हजार रुपयांना मिळते. बाहेरून मूर्ती खरेदी करण्यापेक्षा आपण ती घरी सुद्धा बनवू शकतो. मात्र घरच्याघरी मूर्ती बनवताना व्यक्तींना अडचणी येतात. बाप्पाची सोंड, डोकं आणि पाय व्यवस्थित बनवता येत नाहीत. शिवाय काहींना मूर्ती कशी बनवतात याची देखील माहिती नसते. त्यामुळे आम्ही आज सिंपल स्टेप्समध्ये तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती कशी बनवायची याची महिती सांगणार आहोत.

गणेश मूर्ती बनवण्यासाठी कोणती माती वापरली पाहिजे?

गणेश मूर्ती बनवताना यासाठी योग्य मातीची निवड करणे महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही तलावाच्या शेजारी असलेली माती वापरू शकता. तसेच नदी किनारी असेली माती मूर्ती बनवताना वापरता येते. या सर्वांसह तुम्ही शाडूची माती सुद्धा वापरू शकता.

एक फुट गणपतीसाठी किती माती लागेल?

तुम्ही जर एक फुट शाडू मातीची मूर्ती बनवणार असाल तर त्यासाठी ५ ते ६ किलो शाडूची माती लागते. ही माती खरेदी करण्यासाठी तुम्हाला गणेशोत्सवात कोणत्याही नॉवेल्टीमध्ये मिळेल. तसेच मातीची भांडी विकणाऱ्या व्यक्तींकडे सुद्धा तुम्हाला ही माती सहज मिळेल.

खर्च किती होईल?

शाडूची माती १० ते १५ रुपये किलोपासून ३० ते ५० रुपये किलोपर्यंत मिळते. मातीच्या कॉलिटीवर तिची किंमत ठरत असते. त्यामुळे जशी कॉलिटी असेल तशा पद्धतीने तुम्हाला मातीचा खर्च लागेल.

माती किती दिवस आधी मळून ठेवू शकतो?

माती जास्त दिवस आधी मळून ठेवू नका. फक्त २ दोन दिवस आधी माती मळून घ्या. तसेच मळलेली माती एका सुती कापडामध्ये बांधून ठेवा.

माती कामाचे टूल्स

प्लास्टीकचे आणि स्टीलचे असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स बाजारात उपलब्ध आहेत. यातील स्टीलचे टूल्स ३०० ते ४०० रुपयांपर्यंत मिळतात. तर प्लास्टीकचे टूल्स तुम्हाला १०० ते २०० रुपयांना मिळतील.

पॉलीश पेपर गरजेचा

मूर्ती बनवून झाल्यावर वाळल्यानंतर त्याला छान फिनीशींग यावी यासाठी पॉलीश पेपरने मूर्ती घासून घ्या.

मूर्ती बनवण्याच्या स्टेप्स

१. माती चाळणे

मूर्ती बनवण्यासाठी आपल्याकडे बारीक माती पाहिजे असते. त्यासाठी सर्वात आधी मातीचे तुकडे करून घ्या. तसेच सर्व माती एका चाळणीच्या सहाय्याने बारीक चाळून घ्या.

२. मातीचा गोळा तयार करा

त्यानंतर या मातीमध्ये थोडं पाणी मिक्स करत संपूर्ण मातीचा छान गोळा बनवून घ्या.

३. बेस

त्यानंतर सर्वात आधी बेस बनवून घ्या. यासाठी मातीचा थोडा गोळा घेऊन त्याला सपाट आकार द्या. तसेच एका टोकदार ग्लासच्या सहाय्याने याला सुंदर गोल आकार द्या.

४. मांडीचा आकार

गणपती बाप्पाची मूर्ती बनवताना पुन्हा एकदा मांडीचा आकार बनवण्यासाठी मातीचा थोडा गोळा घ्या आणि त्याला लांब आकार द्या. तयार केलेल्या गोल पाटावर लांब अकार असलेली माती ठेवा आणि एका काठीच्या मदतीने त्यावर रेषा करून घ्या.

५. पोट आणि छाती

पोट बनवण्यासाठी मातीचा थोडा मोठा गोळा घ्या आणि आपण तयार केलेल्या पायांमध्ये हा गोळा ठेवा. पोट बनवून झाल्यावर त्यावर आणखी एक मातीचा गोळा ठेवून त्यावर छातीचा आकार बनवून घ्या.

६. हात, कान आणि सोंड

हात, कान आणि सोंड बवताना हात आणि कान आकार देऊन सहज बनवता येतात. मात्र सोंड झटपट बनवता येत नाही. त्यासाठी देखील लांब आकार मातीचा गोळा घेऊन त्यावर पट्टीच्या सहाय्याने आकार द्या.

रंगकाम

प्रयमरमध्ये कोणत्याही कंपनीचा सफेद रंग तुम्ही मूर्तीला देऊ शकता. स्किन कलरसाठी ऑरेंज, रेड आणि व्हाइट रंगापासून स्किन कलर बनवता येतो. अशा पद्धतीने विविध रंग देत तुम्ही मूर्ती सजवू शकता.

Ganesh Idol Making at Home
Ganesh Chaturthi 2024: गणरायासाठी खास नैवेद्य; मोदकांव्यतिरिक्त गणपती बाप्पाला आवडतात 'हे' गोड पदार्थ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com