Badshah  
मनोरंजन बातम्या

Badshah : बादशाह नवीन गाण्यामुळे अडचणीत; FIR दाखल, नेमकं कारण काय?

FIR Registered Against Badshah : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक बादशाह विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्याचे नुकतेच नवीन गाणे रिलीज झाले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

नुकतेच बादशाहचे नवीन गाणे रिलीज झाले आहे.

बादशाह वादाच्या भोवऱ्यात अडकला.

बादशाह विरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

प्रसिद्ध रॅपर बादशाह (Badshah ) यांनी आजवर आपल्या गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे. त्यांची गाणी कायम सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. मात्र आता बादशाह त्यांच्या एका गाण्यामुळे अडचणीत आला आहे. बादशाह आपले नवीन गाणे Tateeree मुळे कायदेशीर अडचणीत सापडला आहे. TOIच्या वृत्तानुसार, हरियाणात बादशाहविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

बादशाह विरुद्ध महिला आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. बादशाहच्या Tateeree या गाण्यात आक्षेपार्ह बोल (Lyrics) आणि दृश्ये (Visual) वापरण्यात आल्याचा आरोप आहे. पंचकुला येथील सेक्टर 20 येथील सायबर क्राइम पोलीस स्टेशनमध्ये बादशाह विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चंडीमंदिरचे रहिवासी अभय चौधरी यांनी बादशाह विरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, गाण्याचे बोल आणि दृश्ये अश्लील आहेत. बादशाहचे गाणे समाजाला चुकीचा संदेश देत आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, बादशाहच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर रिलीज झालेले Tateeree गाण्यात अश्लील शब्द, हावभाव आहेत. शाळेच्या मुलींचे गणवेशात (school uniform) चित्रण केले आहे. तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की, असे घटक आक्षेपार्ह आहेत आणि समाजाला चुकीचा संदेश देतात. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, हे गाणे अश्लीलतेला प्रोत्साहन देते आणि महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान करते. या प्रकरणाची दखल घेत पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 296 आणि महिलांचे अश्लील प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायदा, 1986 च्या कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.

HSCW च्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी सांगितले की, या प्रकरणाची कार्यवाही सुरू झाली आहे. सविता आर्या या पानिपत, हरियाणा येथील एक सामाजिक कार्यकर्त्या आणि शिव आरती इंडिया फाउंडेशनचे संचालक शिव कुमार यांनीही या गाण्याविरुद्ध तक्रारी दाखल केली आहे. सविता यांनी हरियाणा महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. दोघांनीही Tateeree या गाण्यातील ओळींवर आक्षेप घेतला. बादशाहला 13 मार्च 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता हरियाणाच्या पानिपत येथे सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. Tateeree हे एक हरियाणवी हिप-हॉप सिंगल असून जे 1 मार्च 2026 रोजी रिलीज झाले. जे बादशाहने गायिका सिमरन जागलानसह सादर केले होते. हे गाणे बादशाहने स्वतः लिहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

SCROLL FOR NEXT