बिग बॉसच्या घरात ७ सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
राकेश राखीचे मन दुखावतो, त्यामुळे ती खूप रडते.
राखी रडत रडत स्विमिंग पूलमध्ये उडी मारते.
बिग बॉसच्या घरात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. सुरूवातीपासून राकेश आणि राखीचे नाते चर्चेचा विषय बनले आहे. भाऊच्या धक्क्यावरही रितेश देशमुख राकेश-राखीची मजा-मस्ती करताना दिसतो. दोघांची मस्तीमध्ये लग्न होते, एकमेकांना हार देखील घालतात. तसेच सुंदर फॅमिली फोटो देखील काढला जातो. मात्र राखीला राकेश आणि तन्वीची मैत्री अजिबात आवडत नाही. बिग बॉसने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात राकेश राखीला दुखावताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राखी आणि राकेश गार्डनर एरियात एकत्र बसलेले असतात. राखी राकेशला बोलते की, "सगळ्यांना तुझं-माझं नडतंय..." त्यावर राकेश बोलतो, "त्यांना सांग आपण Friends आहोत आता" त्यानंतर राखी राकेशचा हात पकडते आणि विचारते की, "म्हणजे आता आपण मित्र आहोत?" त्यावर राकेश बोलतो की, "मला दुसऱ्यांना हर्ट करायचे नाहीये..." असे बोलून राकेश उठून जातो. त्यानंतर राखी सावंत खूप रडताना दिसते. शेवटी राखी "I Am Loser" म्हणत स्विमिंग पूलमध्ये उडी मारते. घरातील सदस्यांना मोठा धक्का बसतो. ते तिच्याकडे पाहतच राहतात.
बिग बॉसच्या प्रोमोला खास कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "राखी आणि राकेशच्या गोड नात्याला लागलं ग्रहण? " या व्हिडीओवर प्रेक्षकांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहत्यांचे मस्त मनोरंजन होताना दिसत आहे. राखीच्या नेहमीच्या अशा वागण्यामुळे घरातील सदस्य हैराण झाले आहेत. ती घरात आल्यापासून राकेशसोबत दिसत आहे. आता राखी आणि राकेशच्या नात्याचे पुढे काय होणार, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.
आठव्या आठवड्यात 7 सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यात खालील सदस्यांचा समावेश आहे-
प्राजक्ता शुक्रे
तन्वी कोलते
रुचिता जामदार
दिपाली सयद्द
प्रभू
सागर कारंडे
संस्कृती साळुंके
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.