Vijay Devarakonda SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vijay Devarakonda : विजय देवरकोंडा विरोधात FIR दाखल; आदिवासी समुदायावर वादग्रस्त वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

FIR Against Vijay Deverakonda : साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) सध्या त्याच्या वक्त्यामुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. विजय देवरकोंडाने आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र आता त्याला प्रेक्षकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

अलिकडेच अभिनेता सूर्याच्या 'रेट्रो' चित्रपटाच्या प्रमोशनला गेला होता. तेव्हा विजयवर हैदराबादमधील आदिवासी समुदायाबद्दल टिप्पणी केल्याचा आरोप झाला. त्याने आदिवासी समुदायाच्या भावना दुखावल्या असल्याचे बोले गेले आणि या प्रकरणाची पोलीसांनी चौकशी सुरू केली. विजय देवरकोंडा विरुद्ध 17 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलिकडेच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता विजय देवरकोंडा कार्यक्रमात म्हणाला की, "काश्मीरमध्ये जे काही घडत आहे त्याला थांबवण्यासाठी दहशतवाद्यांना शिक्षित करा. त्यांचे इतरांकडून ब्रेनवॉश होणार नाही याची काळजी घ्या. भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्याची गरज नाही कारण पाकिस्तानी लोक स्वतःच्या सरकारला कंटाळले आहेत. त्यामुळे तेच त्यांच्यावर हल्ला करतील. ते आदिवासी लोकांसारखे वागत आहेत. जसे ते 500 वर्षांपूर्वी विचार न करता भांडत होते."

विजय देवरकोंडाचे हे विधान आदिवासी लोकांना आवडले नाही. आदिवासी समुदायांच्या संयुक्त कृती समितीचे राज्य अध्यक्ष नेनावथ अशोक कुमार नाईक यांनी विजय देवरकोंडा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजयवर आदिवासींची दहशतवाद्यांशी तुलना केल्याचा आरोप केला गेला आहे. आदिवासी समुदायाच्या भावना दुखावल्यामुळे विजय देवरकोंडा विरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

विजय देवरकोंडाने दिलं स्पष्टीकरण

या प्रकरणात पुढे विजय देवरकोंडाने स्पष्टीकरण दिले आहे. त्याने X वर एक पोस्ट करून म्हटले की, "रेट्रोच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमामध्ये मी केलेल्या विधानामुळे काही लोक माझ्यावर नाराज झाली आहेत. मी प्रामाणिकपणे सांगतो की, मला कोणत्याही समुदायाचा अनादर करायचा नाही. विशेषतः आपल्या अनुसूचित जमातींना ज्यांचा मी खूप आदर करतो. त्यांना दुखावण्याचा माझा हेतू नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात गणपती विसर्जनाला रेकॉर्ड, ३१ तासांपासून मिरवणूक सुरूच

Online Food Delivery : ऐन सणासुदीच्या हंगामात महागाईची फोडणी; ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे महागणार?

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : भरतीच्या अडथळ्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब|VIDEO

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार जपून करावे; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

KDMC च्या प्रसुतीगृहात १ दिवसाच्या बाळाचा मृत्यू; डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी हलगर्जी केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT