
भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
देशाशी गद्दारी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर आता या प्रकरणाला नवं वळण मिळालंय... या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.. त्यातच पहलगाम हल्ल्यापुर्वी गद्दार ज्योतीनं थेट पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांचा अड्डा असलेल्या मुरिदकेत हेरगिरीचं विशेष ट्रेनिंग घेतलं.. आणि त्यानंतर ती भारतात सिक्रेट मिशनवर आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय...
गद्दार ज्योतीचं पाकमध्ये ट्रेनिंग
- ज्योतीचा तिसरा पाक दौरा हेरगिरीच्या प्रशिक्षणासाठी
- ज्योती भारतातून थेट इस्लामाबादमार्गे मुरिदकेला गेली
- मुरिदकेत ज्योतीचं खास मोहिमेसाठी 14 दिवसांचं प्रशिक्षण
- पाकमधून परतल्यानंतर ज्योतीचं सिक्रेट मिशन
- मिशनआधीच पहलगाम हल्ला झाल्यानं काम स्थगित
- ज्योतीला पहलगाम हल्ल्याची माहिती असल्याची चर्चा
पहलगाम हल्ल्यानंतर गुप्तचर संस्थांनी देशातील घरभेद्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली.. यामध्ये पाकिस्तानी उच्चायुक्तातील दानिशचं ज्योती मल्होत्राशी असलेलं कनेक्शन समोर आलं...त्यानंतर गुप्तचर संस्थांनी आणखी तपास केला आणि ज्योतीचं हेरगिरी नेटवर्क उघड झालं.. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतलंय...एवढंच नाही तर ज्योतीच्या अटकेनंतर सरकारनं ज्योतीवर डिजिटल स्ट्राईक केलाय... ज्योतीचं 1 लाख 31 हजार फॉलोअर्स असलेलं ट्रॅव्हल विथ जो अकाऊंट ही सस्पेंड करण्यात आलंय..
आता ज्योती मल्होत्राच नाही तिला साथ देणारे सगळेच गुप्तहेर यंत्रणाच्या रडारवर आलेत. पाकचं भारतात असलेलं हे गुप्तहेरांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच काम आता गुप्तचर संस्थांनी हाती घेतलंय. या सर्वांनाच आता देशाशी केलेल्या गद्दारीची किंमत चुकवावी लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.