Prathamesh Parab Shared Fathers Day 2024 Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prathamesh Parab Post : “गेली ३० ते ३५ वर्षांपासून कामाला सायकलने जातात…”, प्रथमेश परबची ‘फादर्स डे’निमित्ताने भावुक पोस्ट

Prathamesh Parab Shared Fathers Day 2024 Post : वडिलांचं प्रेम, वात्सल्य, त्याग, वेदना याची जाणीव कायमच प्रत्येक मुलाला किंवा मुलीला असतेच. ‘फादर्स डे’च्या दिवशी सर्वच वडिलांविषयी कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करताना दिसतात.

Chetan Bodke

आज जून महिन्यातला तिसरा रविवार. आजच्या दिवशी जगभरात ‘फादर्स डे’ सेलिब्रेट केला जात आहे. वडिलांचं प्रेम, वात्सल्य, त्याग, वेदना याची जाणीव कायमच प्रत्येक मुलाला किंवा मुलीला असतेच. आजच्या दिवशी सर्वच वडिलांविषयी कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करताना दिसतात. सध्या अनेकजणं सोशल मीडियावर ‘फादर्स डे’निमित्त इन्स्टा स्टोरी शेअर करत शुभेच्छा देताना दिसत आहे. अशातच काही मराठी सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर ‘फादर्स डे’ निमित्ताने वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केलेली आहे. नुकतंच मराठमोळा अभिनेता प्रथमेश परबनेही भावुक पोस्ट शेअर केली आहे.

प्रथमेश परबने इन्स्टाग्रामवर वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. त्यामध्ये त्याचे वडील सायकल चालवताना दिसत आहे. पोस्ट शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शन दिले की, "हॅप्पी फादर्स डे पप्पा, गेल्या काही वर्षांत खूप काही बदललं. वेगवेगळे सिनेमे, त्यातील कॅरेक्टर्स, कथा, तुम्हाला माणूस म्हणूनही घडवत असतात. चाळीमधून फ्लॅट सिस्टिममध्ये शिफ्ट झालो, आता स्विफ्टची जागा क्रेटाने घेतली. लाईफस्टाईल अपग्रेड होत असली तरी काही गोष्टींची पाळंमुळं आपल्यात कायम रुजू द्यावी हे मात्र मी माझ्या बाबांकडून शिकतोय."

त्याने पुढे आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "गेली ३० ते ३५ वर्षे ते सायकल चालवतात. अजूनही ऑफिसला ते सायकलनेच जातात. काम करत रहावं, माणूस आपोआप फिट रहातो असं त्यांचं म्हणणं आहे! बाबा, तुम्ही आयुष्यभर असेच फिट आणि आनंदी राहा याच ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा!" सध्या प्रथमेशची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रथमेशच्या पोस्टवर चाहत्यांकडून हजारो लाईक्स मिळाले असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

प्रथमेशच्या कामाविषयी सांगायचे तर, अलीकडेच त्याचा ‘होय महाराजा’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत मख्य भूमिकेत अभिनेता संदीप पाठक, अभिजीत चव्हाण, अंकिता लांडे, असे बरेच कलाकार दिसले. याशिवाय प्रथमेश ‘ताजा खबर’ वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये झळकणार आहे. अभिनेता भुवन बाम, श्रिया पिळगांवकर आणि महेश मांजरेकर अशा अनेक कलाकारांबरोबर प्रथमेशने ‘ताजा खबर सीझन २’मध्ये स्क्रिन शेअर करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT