Hoy Maharaja Trailer: प्रथमेश परबच्या ‘होय महाराजा’चा ट्रेलर रिलीज, कॉमेडी आणि मनोरंजनाचा जबरदस्त धमाका

Hoy Maharaja Movie Trailer Released: अभिनेता प्रथमेश परबच्या ‘होय महाराजा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळत आहे.
Hoy Maharaja Movie Trailer: प्रथमेश परबच्या ‘होय महाराजा’चा ट्रेलर रिलीज, कॉमेडी आणि मनोरंजनाचा जबरदस्त धमाका
Hoy Maharaja Movie PosterSaam TV

‘टाईमपास’ चित्रपटातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करणारा प्रसिद्ध अभिनेता प्रथमेश परब सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. प्रथमेश परबने गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘होय महाराजा’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती.

चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता होती. अशातच आता या हटक्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. 'होय महाराजा'च्या ट्रेलरला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Hoy Maharaja Movie Trailer: प्रथमेश परबच्या ‘होय महाराजा’चा ट्रेलर रिलीज, कॉमेडी आणि मनोरंजनाचा जबरदस्त धमाका
Ranbir- Alia Celebrate Diwali In New Bungalow : आलिया- रणबीर लेक राहासोबत नव्या घरात सेलिब्रेट करणार दिवाळी, जोमात सुरू आहे घराचे काम

कॉमेडी कथानक असलेल्या ह्या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहे. प्रथमेश परबच्या एन्ट्रीनेच ट्रेलरची सुरूवात होते. त्याच्या सुटा-बुटातल्या लूकची जोरदार चर्चा होत आहे. सुटा- बुटात इंटरव्ह्यूला चाललेल्या रमेशची (प्रथमेश) बोलबच्चनगिरी ट्रेलरमध्ये दिसते. मामाला मात्र आपल्या भाच्यावर खूप विश्वास असतो. आपला भाचा एक दिवस खूप मोठ्या उंचीवर जाईल असा विश्वास प्रथमेशच्या मामाला असतो. कॉमेडी कथानक असलेल्या या चित्रपटात रमेशची लव्हस्टोरी सर्वाधिक चर्चेची असेल. चित्रपटात नेमकी कशी कॉमेडी खुलते हे ट्रेलर पाहिल्यावर कळेल.

या चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रथमेश परबसह, अंकिता लांडे, अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, समीर चौघुले, वैभव मांगले असे एका पेक्षा एक अफलातून विनोदवीर चित्रपटात दिसणार आहेत. 'होय महाराजा' चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन संचित बेद्रे यांनी केलं आहे. गुरु ठाकूरने लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या संगीतकार जोडीचं संगीत लाभलं आहे. हा चित्रपट येत्या ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Hoy Maharaja Movie Trailer: प्रथमेश परबच्या ‘होय महाराजा’चा ट्रेलर रिलीज, कॉमेडी आणि मनोरंजनाचा जबरदस्त धमाका
OTT Released This Week : मनोरंजनाचा तडका! ‘या’ आठवड्यात तुमच्या आवडीचे चित्रपट OTT वर होणार रिलीज, पाहा संपूर्ण लिस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com