Famous Actress SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : दिग्दर्शकाचं किळसवाणं कृत्य; प्रसिद्ध अभिनेत्रीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श, घाबरून बॉलिवूड इंडस्ट्री सोडली

TV Actress Casting Couch Experience :'कुमकुम भाग्य' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने कास्टिंग काउचचा भयानक अनुभव सांगितला आहे, जो वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

Shreya Maskar

मनोरंजन विश्वात नाव कमावताना सुरुवातीच्या काळात अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा सामना करावा लागतो. अनेकांच्या वाट्याला खूप वाईट अनुभव येतात. हिंदी टिव्ही विश्वातील प्रसिद्ध चेहरा असलेली अभिनेत्री शिखा सिंहने (Shikha Singh) देखील कास्टिंग काउचा शिकार झाली. अभिनेत्री शिखा सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती आजवर अनेक मालिकांमध्ये झळकली आहे.

'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्री शिखा सिंहने 'टेली मसाला'ला दिलेल्या मुलाखतीत आपण चित्रपटात काम का केले नाही, याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली, " चित्रपटासाठी ती माझी पहिली आणि शेवटची ऑडिशन होती. चित्रपट निर्माता-दिग्दर्शक सोफ्यावर बसले होते आणि हळू हळू माझ्या जवळ आले. त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तो म्हणाला, तू हिरोईन बनू शकते..." मात्र दिग्दर्शकाच्या अशा वागण्याने अभिनेत्री घाबरली. चित्रपटात काम करण्यास नकार देऊन ती ऑफिसमधून पळून गेली. या धक्कादायक घटनेमुळे शिखाने कोणत्याही चित्रपटासाठी पुढे ऑडिशन दिली नाही आणि टेलिव्हिजनमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

शिखा सिंहचे करिअर

शिखा सिंहने 'लेफ्ट राईट लेफ्ट' या लोकप्रिय मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 'कुमकुम भाग्य' या मालिकेतून शिखा सिंहला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली. 'नागिन ६', 'मेरी डोली तेरे अंगना', 'घर की लक्ष्मी बेटियां', 'ना आना इस देश लाडो' , 'अदालत', 'ससुराल सिमर का', 'फुलवा' अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली आहे.

वैयक्तिक आयुष्य

शिखा सिंहने २०१६ साली करण शाहशी लग्नगाठ बांधली. तिला २०२० मध्ये मुलगी झाली. आता शिखा सिंह अभिनयासोबतच सुखाने आपला संसार करत आहे. ती सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ, फोटो शेअर करून आपले लाइफ अपडेट देत राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT