प्रसिद्ध गायकाचे निधन
गायकाने वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हृदयविकाराच्या झटक्याने गायकाचे निधन झाले
संगीत विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक पेप्सी शर्मा ( Pepsi Sharma or Yashpal Sharma) यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या ३८ व्या वर्षी गायकाने अखेरचा श्वास घेतला. गायकाच्या निधनाने संगीत आणि मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गायकाच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांना मोठा धक्का बसला.
freepressjournal च्या वृत्तानुसार, लोकप्रिय हरियाणवी गायक पेप्सी शर्मा यांचे मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने लाखो चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. ते लोकगीते गाण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाची बातमी समजताच कलाकार मंडळी आणि चाहत्यांनी गायकावर श्रद्धांजली वाहिली आहे.
पेप्सी शर्मा यांचे खरे नाव यशपाल शर्मा असे आहे. ते केवळ गायकच नव्हे तर कॉमेडियन, संगीतकार आणि 'लाईव्ह स्टेज परफॉर्मर' देखील होते. हरियाणा, उत्तर प्रदेश आणि आसपासच्या भागांत होणाऱ्या पारंपरिक 'रागणी' गायन स्पर्धासाठी ते प्रसिद्ध होते.
यशपाल शर्मा हे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील पाटला गावचे रहिवासी होते.'ये दिल है हिंदुस्तानी' सारख्या टिव्ही शोमध्येही ते झळकले होते. त्यांनी अनेक गाणी गायली आणि संगीतबद्ध केली आहेत. त्यापैकी 'सावन की बूंद', 'भोले के दिवाने' आणि 'तेरे जीजा से मैं तंग आली' ही त्यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.