सूरज चव्हण लवकरच बाबा होणार
सूरज चव्हणच्या बायकोचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा व्हिडीओ समोर आला
सूरज चव्हणने नोव्हेंबर 2025 मध्ये लग्नगाठ बांधली.
'बिग बॉस मराठी ५' चा विजेता सूरज चव्हाण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. सूरज चव्हाण बाबा होणार असल्याची चर्चा काही महिन्यांपासून सोशल मीडियावर रंगली आहे. काही महिन्यापूर्वी बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे सूरजच्या बायकोचे म्हणजे संजनाचे फोटो व्हायरल झाले होते. अशात आता संजनाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिचा बेबी बंप दिसत आहे.
मराठी अभिनेत्री आणि सूरजची मानलेली बहीण जान्हवी किल्लेकर नुकतीच सूरजच्या घरी त्याला भेटायला गेली होती. या भेटीचा सुंदर व्हिडीओ जान्हवीने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात जान्हवी सूरज आणि संजनाला भेटताना दिसत आहे. संजनाने प्रिंटेड लूज कुर्ती आणि पँट घातली असून त्यावर स्कार्फ ओढला होता. व्हिडीओत तिघेही मंदिरात जाताना दिसत आहे. तेव्हा संजना देवाच्या पाया पडण्यासाठी खाली वाकते, तेव्हा जान्हवीने तिचा हात पकडून तिला उभे राहायला मदत करते. तसेच संजना जान्हवीसोबत चालताना दिसत आहे. तेव्हा देखील तिचा बेबी बंप दिसत आहे. यामुळे सूरज चव्हाण आता लवकरच बाबा होणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. मात्र अद्याप सूरजने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
जान्हवीने व्हिडीओला एक खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, "कोणी असो-नसो...मी कायम तुझ्या सोबत आहे... तुला जपणार आहे..." जान्हवीच्या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहे. बहीण-भावाच्या नात्यामधील प्रेम चाहत्यांना खूप आवडते. सूरज चव्हाण इन्स्टाग्राम खूप सक्रिय असतो. डान्स रीलमधून तो आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. तसेच अलिकडेच त्याचा 'झापुक झुपुक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
गुलीगत किंग सूरज चव्हाण आणि संजना २९ नोव्हेंबर २०२५ लग्न बंधनात अडकला. सूरजने चुलत मामाची मुलगी संजनासोबत लग्नगाठ बांधली. सूरज चव्हाण'बिग बॉस मराठी 5'मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला. लग्न सोहळ्यात हळदीपासून ते लग्नापर्यंत सर्व कार्यक्रमात बिग बॉसची किलर गर्ल जान्हवी किल्लेकर दिसली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.