Jennifer Winget: १२ वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, आता सिंगापूरच्या उद्योगपतीसोबत दुसऱ्यांदा संसार थाटणार ही फेमस अभिनेत्री

Jennifer Winget Wedding: टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सिंगापूरमधील उद्योगपती इश्माएल विल्यमसोबत तिचं लग्न होणार आहे.
Jennifer Winget
Jennifer WingetSaam tv
Published On

Jennifer Winget Wedding: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 'बेहद' आणि 'दिल मिल गये' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या जेनिफरच्या लग्नाबाबत सध्या विविध चर्चा रंगत आहेत. सिंगापूरमधील उद्योगपती इश्माएल विल्यम याच्यासोबत ती विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगली आहे.

वृत्तांनुसार, जेनिफर आणि इश्माएल विल्यम गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनीही आपले नाते सार्वजनिकरित्या स्वीकारले नसले तरी त्यांच्या जवळच्या सूत्रांकडून लग्नाच्या तयारीबाबत माहिती समोर आली आहे. अलीकडेच एका पिकनिकदरम्यान विल्यमने जेनिफरला प्रपोज केले. त्यावर तिने होकार दिला असून दोघांनीही आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Jennifer Winget
Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार; स्वत:च तारिख सांगितली, म्हणाला...

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या हे कपल लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. हे कपल ख्रिश्चन परंपरेनुसार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. लग्न सप्टेंबर-ऑक्टोबर किंवा डिसेंबर-जानेवारी करण्यात येईल असे जेनिफरच्या मित्रांनी सांगितले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी जेनिफरचे नाव तिचा जवळचा मित्र आणि सहकलाकार करण वाही याच्यासोबत जोडले गेले होते. दोघे डेट करत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र, करण वाहीने या अफवा असून दोघांही चांगले मित्र आहेत असे स्पष्ट केले होते.

Jennifer Winget
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांना नक्की काय झालंय? पहाटे केलेल्या 'या' पोस्टमुळे चाहते चिंतेत

जेनिफर विंगेटचे यापूर्वी २०१२ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्न झाले होते. मात्र, दोन वर्षांनंतर २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर जेनिफरने तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच खासगी ठेवले. आता पुन्हा एकदा तिच्या लग्नाच्या चर्चांनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com