Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सध्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या ब्लॉग आणि सोशल मीडियावरील विचारांमुळे अधिक चर्चेत असतात. 83 वर्षीय एक सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणाक सक्रिय असतात. बिग बींनी नुकत्याच शेअर केलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये जीवनातील समस्या, त्यांचे महत्त्व आणि त्यातून मिळणारे अनुभव यावर भाष्य केले आहे. त्यांच्या या विचारांनी अनेकांना विचार करण्यास भाग पाडले असून सोशल मीडियावरही या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे.
5 जून रोजी पहाटे 3:22 वाजता आपल्या ब्लॉगवर लिहिताना अमिताभ बच्चन यांनी जीवनातील अडचणींकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मांडला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, समस्या या केवळ अडथळे नसून त्या आपल्याला शिकण्याची आणि अधिक सक्षम बनण्याची संधी देतात. प्रत्येक समस्येचे त्वरित निराकरण करणे आवश्यक नसते, कारण त्या समस्येमुळे परिस्थितीचा सखोल अभ्यास करण्याची आणि त्यातून ज्ञान मिळवण्याची संधी मिळते.
अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिले, जेव्हा आयुष्यात एखादी समस्या येते, तेव्हा त्यातून खूप काही शिकता येतं. कारण त्यामुळे आयुष्याच्या अनेक पैलूंबद्दल जाणून घेण्याची संधी मिळते. समस्यांमुळे लोकांना अधिक शहाणे बनण्यास आणि भविष्यात अशाच परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होण्यास मदत करते. शिकण्यासाठी समस्या असणे आवश्यक नाही, परंतु पुढच्या वेळी तशीच समस्या उद्भवल्यास, ती केवळ सोडवण्यासाठीच नव्हे, तर शिकवण्यासाठी असतात हे समजून घेणे गरजेचे आहे.
ही पोस्ट त्यांना X वर शेअर केली. त्यांच्या पोस्ट खाली त्यांची चिंता व्यक्त करणाऱ्या अनेक कमेंट आल्या आहेत. एका चाहत्याने विचारले सर तुम्ही ठिक आहात ना? तर दुसऱ्याने म्हटले पहाटे फारच आयुष्यातील समस्या आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करणे शरिरासाठी चांगले नाही. आणखी एकाने लिहिले, अमिताभ सरांना काय झालं? ते असे का बोलत आहेत?
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे तर ते शेवटचे 'वेट्टैयन' या चित्रपटात झळकले होते. सध्या ते कल्कि 2898 AD च्या पुढील भागाच्या तयारीत व्यस्त आहेत. तसेच ते ‘रामायणम’मध्ये जटायूची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत, मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.