Famous Actor saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor : दारूच्या नशेत अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Famous Actor-Hit And Run Case : प्रसिद्ध अभिनेत्याने दारूच्या नशेत कार ठोकली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्याने दारूच्या नशेत गाडी चालवली आणि गाडीचा अपघात झाला.

अपघातात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी अभिनेत्याला ताब्यात घेतले आहे.

मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केरळमध्ये 'हिट अँड रन' ची घटना घडली आहे. प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याने मद्यपान करून हे कृत्य केले आहे. अभिनेता सिद्धार्थ प्रभू मद्यधुंद अवस्थेत असताना ही घटना घडली आहे. या 'हिट अँड रन' प्रकरणात 53 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी सिद्धार्थ प्रभूवर गुन्हा दाखल केला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

सिद्धार्थ प्रभू मद्यधुंद अवस्थेत कार चालवून कोट्टायमकडून येत होता. अभिनेता नशेत असल्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याची गाडी समोरच्या वाहनाला धडकली. कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 53 वर्षीय व्यक्तीला धडक दिली. ज्याचे नाव कनकराज असे आहे. हा व्यक्ती लॉटरीचा व्यवसाय करत होता. या रोड अपघातात कनकराज गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास कोट्टायम येथे एम. सी. रोडवर घडली.

अपघात झाल्यावर लोक जमा झाली. सिद्धार्थ दारूच्या नशेत असल्यामुळे त्याने सर्वांना शिवीगाळ घातली. तसेच अभिनेत्याचे पोलिसांसोबत देखील भांडण झाले. धक्काबुक्की देखील झाली. मात्र शेवटी अभिनेत्याला पोलीसांनी ताब्यात घेतले. जेव्हा सिद्धार्थची वैद्यकीय चाचणी झाली, तेव्हा समजलं की, तो दारू पिऊन गाडी चालवत होता. तब्बल सात दिवस कनकराज रुग्णालयात दाखल होता. अखेर 1 जानेवारी 2026 ला त्याने अखेरचा श्वास घेतला. कनकराज यांच्या निधनानंतर अभिनेत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेता सिद्धार्थ प्रभू हे मनोरंजन सृष्टीतील मोठे नाव आहे. त्याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. 2011 मध्ये रिलीज झालेल्या 'आक्स्मिकम' या चित्रपटातून त्याने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्याने 'थट्टिम मुट्टिम' आणि 'उप्पम मुळकम' असे चित्रपट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT