

सध्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत लाइफस्टाइमध्ये अनेक बदल झाले आहे. अनेक सवयी जसे की, खाण्याचे पदार्थ, झोपण्याच्या वेळा, श्रमाची कष्टाची कामे आणि इंटरनेटचा दिवसरात्र वापर. याचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर होत असतो. त्याच अलिकडे झालेल्या संशोधनात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामध्ये रिल्स पाहण्यासाठी अनेक जीवघेणे धोके निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. पुढील लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
इंस्टाग्रामवरील educating.facts या अकाउंट शेअर झालेल्या एका पोस्टमध्ये एक खलबळजनक बातमी आहे. जी प्रत्येकासाठी महत्वाची आहे. यामध्ये जे लोक दिवसभर सोशल मिडीयावर रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ पाहतात. त्यांच्या मेंदूवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो असं म्हंटले आहे.
याचे संशोधन सध्या जगभराचेचा विषय ठरत आहे. महत्वाची बाब म्हणजे याचा परिणाम मेंदूवर मद्यपानाने किंवा धुम्रपानाने होणाऱ्या नेशेपेक्षा ५ पट जास्त प्रमाणात होतो. ही अत्यंत चितांजनक बातमी आहे.
तुम्ही जर याच डिजीटल व्यसनाच्या आहारी केला असात तर तुमचा मेंदू व्यवस्थित कार्य करू शकणार नाही. सारखं रिल्स किंवा शॉर्ट व्हिडिओ पाहणाऱ्या व्यक्तींमध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि मेंदूची नियंत्रण शक्ती कमी होण्याची शक्यता जास्त असते. सतत वेगाने स्क्रोलिंग केल्याने मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीमवर सतत अलर्ट मिळतात. याने मेंदूला प्रत्येक क्षणाला नवीन आणि वेगळी माहिती हवी असते, अशी सवय लागते.
तज्ज्ञांच्या मते, अशा वेगवान कंटेंटमुळे मेंदू संथ आणि सखोल विचार करणं थांबवतो. पुस्तक वाचनं, अभ्यास, खूप चर्चेसारख्या गोष्टींमध्ये लक्ष टिकवणं कठीण होतं. मात्र, याचा अर्थ रील्स पाहिल्याने मेंदूचे थेट नुकसान होते, असा नाही. हा बदल मेंदूच्या कार्यपद्धतीत आणि लक्ष देण्याच्या सवयींमध्ये होतो, असं शास्त्रज्ञ स्पष्ट करतात. त्यामुळे जमेल तितकं रिल्स स्क्रोल करणं बंद करा.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.