Sachin Pilgaonkar : "तुमचं भलं होवो!"; सचिन पिळगांवकरांनी ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

Sachin Pilgaonkar Reply To Trollers : मराठी दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकरांनी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.
Sachin Pilgaonkar Reply To Trollers
Sachin Pilgaonkar saam tv
Published On
Summary

सचिन पिळगांवकर कायम आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात.

सध्या अभिनेते 'मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद 4' मध्ये दिसत आहे.

सचिन पिळगांवकर यांनी ट्रोल करणाऱ्यांना चांगले सुनावले आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीतील मोठं नाव म्हणजे सचिन पिळगांवकर होय. अभिनेत्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांत काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. गेल्याकाही काळापासून ते सोशल मीडियावर आपल्या वक्तव्यामुळे चांगले ट्रोल होत आहेत. त्यांचे मोठ्या किस्से ऐकून नेटकरी त्यांची खिल्ली उडवतात. सध्या सचिन पिळगांवकर 'मी होणार सुपरस्टार : छोटे उस्ताद' या शोमध्ये जज म्हणून पाहायला मिळत आहेत.

सचिन पिळगांवकर हे एक उत्तम अभिनेत्यासोबतच लेखक, दिग्दर्शक, गायक, नृत्य दिग्दर्शक देखील आहे. नुकतीच त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले आहे. त्यामुळे सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सचिन पिळगांवकर नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.

सततच्या होणाऱ्या ट्रोलिंगवर सचिन पिळगावकर म्हणाले की, "ट्रोलिंग करणाऱ्यांना तुमचे काम माहीत नसेल, तर त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही. करिअरच्या 62व्या वर्षी मी त्यांना इतका महत्त्वाचा वाटत असेन. मी लोकप्रिय असेन. आज मी जे काही कमावलं आहे, ती परमेश्वराची कृपा आहे... कदाचित टीकाकारांना मी त्यांच्या वयाचा वाटतो, म्हणून ते माझ्यावर टीका करतात. टीकाकारांना याची जाणीव नाही की, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे... मी नेहमी काम करत राहणार... त्यांचं भलं व्हावं, असा आशीर्वाद टीकाकारांना देईन."

सचिन पिळगांवकर , सुप्रिया पिळगांवकर यांच्या सारखीच त्यांची लेक श्रिया पिळगांवकर देखील मनोरंजनसृष्टीत काम करत आहे. तिने हिंदी इंडस्ट्रीत आपले मोठे नाव कमावले आहे. सचिन पिळगांवकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. वेगवेगळे डान्स व्हिडीओ , सुंदर फोटो शेअर करतात. 'मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद 4' शनिवार-रविवार रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळते.

Sachin Pilgaonkar Reply To Trollers
Tharala Tar Mag Video : नवऱ्याचं अफेअर अस्मिताला कळलं; अर्जुनने थेट कानशिलात लगावली, मालिकेत येणार 'हे' धक्कादायक वळण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com