Sakshi Sunil Jadhav
2026 च्या सुरुवातीला कुंभ राशीच्या लोकांचं मन अस्वस्थ राहू शकतं. या दिवसांमध्ये संयम आणि धैर्य राखणं खूप गरजेचं आहे.
व्यवसाय किंवा नोकरीसाठी दुसऱ्या शहरात किंवा परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. परदेश प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
15 जानेवारीनंतर जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. मात्र 13 फेब्रुवारीनंतर आरोग्यात सुधारणा होण्याचे संकेत आहेत.
नवीन वर्षात उत्पन्नाचे स्रोत वाढतील, पण त्याचबरोबर घर, वाहन आणि वैयक्तिक खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.
20 एप्रिलनंतर नोकरीत बढती, नवीन जबाबदारी किंवा चांगल्या संधी मिळू शकतात. करिअरच्या दृष्टीने हा काळ सकारात्मक ठरेल.
2026 मध्ये कुंभ राशीच्या लोकांची प्रॉपर्टी वाढण्याची शक्यता आहे. घर, जमीन किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
30 मेनंतर शैक्षणिक कामात सुधारणा दिसून येईल. विद्यार्थ्यांसाठी तसेच व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक ठरेल.
वर्षाच्या मध्यात संतानाकडून आनंदाची बातमी मिळू शकते. घरात धार्मिक कार्यक्रम किंवा शुभ कार्य होण्याचे योग आहेत.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नोकरीत बदल, स्थानांतर किंवा कामाचा ताण वाढू शकतो. मात्र मेहनतीमुळे उत्पन्न वाढीचे मार्ग खुलतील.