Hollywood Actress Imani Diya Smith Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं; बॉयफ्रेंडला अटक

Hollywood Actress Imani Diya Smith: प्रसिद्ध अभिनेत्रीची तिच्या बॉयफ्रेंडने निर्घृण हत्या केली. इमानी दिया स्मिथ असं या अभिनेत्रीचे नाव होते. बॉयफ्रेंडने चाकूने सपासप वार करत इमानीला संपवले. आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Priya More

Summary -

  • ‘द लायन किंग’ चित्रपटातील अभिनेत्रीची हत्या

  • न्यू जर्सीतील घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

  • बॉयफ्रेंडने चाकूने वार करत केली हत्या

  • अवघ्या २५व्या वर्षी अभिनेत्रीचा मृत्यू झाल्यामुळे चाहत्यांना धक्का

अमेरिकेच्या चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. 'द लायन किंग' या हॉलिवूड चित्रपटामध्ये यंग नालाची भूमिका साकारणारी अभिनेत्री इमानी दिया स्मिथची हत्या करण्यात आली. इमानी २५ वर्षांची होती. बॉयफ्रेंडने चाकूने सपासप वार करत तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी इमानीच्या बॉयफ्रेंडला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. इमानीच्या मृत्यूमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला.

इमानी दिया स्मिथच्या हत्येचे वृत्त समोर येताच सोशल मीडियावर खळबळ उडाली. इमानीचा मृत्यू झाला यावर तिच्या चाहत्यांचा विश्वास बसत नाहीये. २५ वर्षीय इमानीचा मृतदेह तिच्या अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये असलेल्या घरामध्ये आढळून आला. तिच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आल्याच्या अनेक जखमा दिसून आल्या. इमानी दिया स्मिथच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली. पोलिस सध्या त्याची चौकशी करत आहेत.

पोलिसांनी सांगितलेकी, इमानी दिया स्मिथ न्यू जर्सीच्या एडिसन परिसरातील घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इमानीच्या शरीरावर चाकूचे अनेक वार करण्यात आले होते. जखमा खोलवर असल्यामुळे अधिक रक्तस्राव झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत तिला न्यू ब्रंसविकमधील रॉबर्ट वूड जॉन्सन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण अधिक रक्तस्राव झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

इमानीचा बॉयफ्रेंड जॉर्डन डी जॅक्सन स्मॉलने तिची हत्या केल्याचा आरप आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत जॉर्डनला अटक केली. जॉर्डनवर आधीच मुलाची सुरक्षितता धोक्यात आणल्याप्रकरणी आणि शस्त्रांशी संबंधित एका प्रकरणात गुन्हा दाखल आहे. इमानीच्या पश्चात तिचा ३ वर्षांचा मुलगा, आई-वडील आणि दोन लहान भावंडे आहेत. एडिसन पोलिस इमानीच्या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. इमानीने २०११ ते २०१२ पर्यंत ब्रॉडवे म्युझिकल 'द लायन किंग' मध्ये ज्युनियर नालाची भूमिका साकारली होती. इमानी फक्त उत्कृष्ट अभिनेत्रीसोबतच उत्कृष्ट गायिका आणि डान्सर देखील होती. तिच्या मृत्यूमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. तिचा चाहते सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Zilla Parishad Election: भाजपनं ठाकरेंचा उमेदवार पळवला? पनवेल तहसील कार्यालयावर शेकापचा राडा, माघार घेण्यावरून रंगला राजकीय ड्रामा

Maharashtra Live News Update: मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर खुनी हल्ला

Morning Yoga Poses: दररोज सकाळी फक्त १५ मिनिटे करा योगा, संपूर्ण दिवसभर राहाल फ्रेश

SCROLL FOR NEXT