

ज्ञानदा रामतीर्थरकर या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतीच एक आनंदाची तिच्या चाहत्यांना दिली. सध्या मनोरंजन सृष्टीत लग्नाची धामधूम सुरु असताना अभिनेत्री ज्ञानदाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर लवकरच लग्न बंधनात अडकण्याची बातमी चाहत्यांना मिळाली.
अभिनेत्री ज्ञानदाने तिच्या सोशल मीडियावर मेंहदींचे व्हिडीओ शेअर केले आणि चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाची उत्सूकता वाढली. कारण या व्हिडीओमध्ये नव्या नवरीसारखीच मेंहदी तिच्या हातावर पाहायला मिळाली. त्यामध्ये तिच्या सुंदर हसऱ्या गोड गोजिऱ्या चेहऱ्यावर लग्नाची उत्सुकता पाहायला मिळाली. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने ''हात मेहेंदीने भरलेले आणि ह्रदयात त्याने जागा केलीये'' असं लिहीलं आहे. इतकंच नाही तर शेवटी तीने अंगठीचं इमोजीही ठेवलं होतं.
पुढे ज्ञानदाने आणखी एक भन्नाट व्हायरल होणारी पोस्ट केली. हा सुद्धा व्हिडीओच होता. त्यामध्ये तिने लग्न ठरल्याची आनंदाची बातमी दिली आहे. व्हिडीओमध्ये जोडीदाराचा हात हात घेत ''ठरलं... कळवतो लवकरच! असं लिहीलं आहे. या पोस्टमुळे चाहत्यांची उत्सूकता आणखीनच वाढली आहे. पोस्टवर अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. म्हणजेच ज्ञानदा आता लग्नाच्या बेडीत अडकणार हे पक्कं झालं आहे.
ज्ञानदा ही अनेक मराठी मालिकांमध्ये काम करून तिच्या अभिनयाने लोकांच्या मनात घर करून राहीली आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील अप्पू हे पात्र साकारून या अभिनेत्रीला प्रचंड चाहता वर्ग मिळाला. सध्या ही अभिनेत्री 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत काव्याची भूमिका साकारत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.