Christmas Saree: ख्रिसमसला कोणती साडी नसावी? लाल- पांढऱ्या साड्यांचे 'हे' पॅटर्न वापरा, दिसाल सुंदर अन् सगळ्यात हटके

Sakshi Sunil Jadhav

ख्रिसमस पार्टी

ख्रिसमस पार्टीला साडीमध्ये स्टायलिश आणि हलक्या मेकअपमध्ये सुंदर दिसायचं असेल, तर पांढऱ्या आणि लाल रंगांच्या साड्या हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.

Party Wear Saree

पांढऱ्या साडीवर लाल बॉर्डर

पांढऱ्या साडीवर लाल रंगाची जाड किंवा टेम्पल डिझाईन बॉर्डर ख्रिसमससाठी परफेक्ट दिसते. हा पॅटर्न पारंपरिक आणि एलिगंट लूक देतो.

red white saree

रेड फ्लोरल प्रिंट साड्या

लाल रंगाच्या फ्लोरल प्रिंट असलेल्या पांढऱ्या साड्या पार्टीसाठी ट्रेंडी आणि फ्रेश लूक देतात. हलका मेकअप केल्याने लूक अजून सुंदर दिसतो.

christmas party saree look

पोल्का डॉट किंवा जिओमेट्रिक पॅटर्न

पांढऱ्या किंवा लाल साड्यांवर छोटे पोल्का डॉट्स किंवा जिओमेट्रिक डिझाईन तरुण आणि मॉडर्न लूकसाठी उत्तम ठरतात.

festive saree styling

लेस आणि एम्ब्रॉयडरी डिझाईन

ख्रिसमस पार्टीसाठी लेस वर्क किंवा हलकी एम्ब्रॉयडरी असलेली साडी निवडली पाहिजे. यामुळे साडी नाजूक आणि ग्रेसफुल दिसते.

saree for christmas party

ज्वेलरीचे ऑप्शन्स

पांढऱ्या-लाल साडीसोबत सिल्व्हर ज्वेलरी, पर्ल नेकलेस किंवा छोटे ऑक्सिडाईज्ड इअररिंग्स खूप सुंदर दिसतात. जड दागिने टाळा.

saree for christmas party

रेड स्टोन किंवा पर्ल अ‍ॅक्सेसरीज

लाल स्टोनची बांगडी, पर्ल स्टड्स किंवा मिनिमल रिंग्स लूकमध्ये बॅलन्स आणतात आणि ओव्हरड्रेसिंग टाळतात.

saree for christmas party

मेकअप टिप्स

नाजूक अन् सुंदर दिसण्यासाठी न्यूड बेस, हलका ब्लश, रेड किंवा पिंक लिपस्टिक आणि सॉफ्ट आय मेकअप परफेक्ट ठरतो.

saree for christmas party

फुटवेअर आणि बॅग सिलेक्शन

सिल्व्हर किंवा न्यूड हिल्स, तसेच छोटा क्लच बॅग साडी लूक पूर्ण करते. फार चमकदार फुटवेअर टाळा.

saree for christmas party

NEXT: Best CNG Cars: सर्वात जास्त मायलेज देण्याऱ्या 10 टॉप CNG कारची यादी

Best CNG Cars
येथे क्लिक करा