जिओने नव्या वर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी एक आकर्षक न्यू ईयर रिचार्ज प्लान शेअर केला आहे. फक्त 500 रुपयांच्या किमतीत येणारा हा प्लान 28 दिवसांच्या असणार आहे. यात डेटा, कॉलिंग आणि अनेक डिजिटल सुविधा दिल्या जाणार आहे. जिओच्या या प्लानमुळे कमी किमतीत जास्त फायदे मिळत असल्याने तो सध्या चर्चेत आहे.
जिओच्या या न्यू ईयर प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळेल. म्हणजेच 28 दिवसांच्या संपूर्ण वैधतेदरम्यान एकूण 56GB डेटा तुम्हाला मिळेल. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली असून दररोज 100 SMS चा लाभही ग्राहकांना मिळतो. डेटा आणि कॉलिंगसोबतच या प्लानमध्ये मनोरंजनावरही खास भर देण्यात आला आहे.
जिओच्या या 500 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये तब्बल 14 OTT प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन सुद्धा मिळणार आहे. यामध्ये YouTube Premium, Amazon Prime Mobile Edition, JioHotstar आणि Sony LIV यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. याशिवाय ZEE5, Lionsgate Play, Discovery Plus, Sun NXT अशा अनेक इतर मनोरंजन प्लॅटफॉर्म्सचेही एक्सेस या प्लानमध्ये मिळतील.
जिओ या प्लानसोबत JioAICloud चे 50GB क्लाउड स्टोरेजही दिले आहे. त्यामुळे फोटो, व्हिडिओ आणि इतर महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवणे ग्राहकांना खूप सोपं होणार आहे. याशिवाय कंपनी JioHome या सेवेचा दोन महिन्यांचा मोफत ट्रायल देखील देत आहे, ज्यामुळे स्मार्ट होम अनुभव घेता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.