Famous Director Son Death : प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ४ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू, लिफ्टमध्ये अडकला अन्...

Famous Director Son Passes Away : प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या साडेचार वर्षांच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Famous Director Son Passes Away
Famous Director Son DeathSAAM TV
Published On
Summary

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दिग्दर्शकाच्या साडेचार वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

लिफ्टमध्ये अडकून चिमुकल्याचा मृत्यू झाला.

मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लहान मुलाचे निधन झाले आहे. 'केजीएफ' चे सह दिग्दर्शक किर्तन नाडागौडा (Kirtan Nadagouda) यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. किर्तन नाडागौडा यांच्या साडेचार वर्षांच्या लहान मुलाचा लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्टनुसार, किर्तन नाडागौडा यांच्या मुलांचे नाव सोनार्श (Sonarsh Nadagouda ) असे होते. किर्तन नाडागौडाच्या निधनाची बातमी ऐकताच मनोरंजनसृष्टीतून आणि राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे.

किर्तन नाडागौडा यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सोनार्शला प्रेमळ आणि उत्साही मुलगा म्हटले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना हैदराबादमध्ये घडली. चिमुकला सोनार्श खेळता खेळता एकटाच लिफ्टमध्ये गेला. तेव्हा तो लिफ्टमध्ये अडकला. त्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र या भीषण अपघातात मुलांचा मृत्यू झाला.

Famous Director Son Passes Away
Akshaye Khanna : 'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्ना पोहचला अलिबागला; घराची केली वास्तुशांती, VIDEO होताय व्हायरल

किर्तन नाडागौडा हे कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. त्यांचा 'सलार' चित्रपट देखील सुपरहिट झाला. सोनार्शच्या अशा अचानक जाण्याने आई-वडीलांना मोठा धक्का बसला आहे.

Famous Director Son Passes Away
Famous Actor Father Death : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला पितृशोक, वडिलांच्या आठवणीत केली भावुक पोस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com