

जिल्हा परिषदेच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर लगेच निवडणुका होतील.
जिल्हा परिषद पंचायत समिती महत्त्वाचे आहे.
३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रक्रिया पूर्ण होणार
नगरपरिषद नगर पंचायतच्या निवडणूक प्रक्रियेत त्रुटी आढळल्यानंतर निकाल लांबणीवर पडलाय. दुसरीकडे ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रक्रिया पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर मत मोजणी लांबल्यानं पुढील टप्प्यातील जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार याबाबत प्रश्न विचारली जात आहेत. आता या निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार भाष्य केलंय.
नागपूरात एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी जिल्हा परिषदा आणि महानगर पालिकेच्या निवडणुका कधी होणार याबाबत सुतोवाच केलेत. आता नगरपरिषद आणि नगर पंचायतच्या निवडणुका झाल्या आहेत. काही बाकी आहेत, त्या निवडणुकासुद्धा लगेच होतील. लगेचच महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता अजित पवार यांनी वर्तवलीय.
जिल्हा परिषदेच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर लगेच जिल्हा परिषद निवडणुका होतील मात्र त्याबद्दल निवडणूक आयोग निर्णय घेईल. ३१ जानेवारी पर्यन्त सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या पाहिजे असं न्यायालयाने सांगितलं होतं. नऊ वर्ष झाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक झाल्या नाहीत, कार्यकर्त्यांची वेळ वाया गेल्याचं अजित पवार म्हणालेत.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र सुद्धा दिला.कार्यकर्त्यांनी नेहमी तत्पर असले पाहिजे,एकटा आहे, असं समजू नये. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. विदर्भातील जिल्हा परिषदा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये आहेत, पण कार्यकर्त्यांनी तयार राहायला पाहिजे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत नवीन कार्यकर्ते आणि जुन्या कार्यकर्त्यांना वाटते की आपण निवडणूक लढवल्या पाहिजे. लोकसभेला लोक पक्षाचा विचार करतात.
विधानसभेला ५० पक्ष आणि ५० टक्के उमेदवाराला महत्व दिलं जातं, मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीत २५ टक्के पक्ष व आणि ७५ टक्के उमेदवाराला महत्व दिले जाते. गरीब वर्गाची लोकांचे काम केल्यावर गरीब लोक कधीच विसरू शकत नाही, पण मोठी लोकांची नऊ काम केली आणि एक काम नाही केलं तरी ते लोक सोडून जातात, त्यामुळे गरीब लोकांची काम करा, असा सल्ला अजित पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमी महिलांना झुकते माप दिले आहे. लाडकी बहीण योजना ही राज्यात लोकप्रिय झाली.त्यामध्ये वेगवेगळी मतप्रवाह सुद्धा आहेत, कोणतीही योजना आल्यानंतर त्यांचं कोणी समर्थन करेल असं नाही. यशवंतराव चव्हाणप्रमाणे आम्ही बेरजेचे राजकारण करतो. राजकारणात कायम कोणाचीच मक्तेदारी नसते. पवार साहेबांचा 85 वा वाढदिवस होता त्यामुळे मी त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, या राज्यात व देशात पवार साहेबांचं योगदान मोठं असल्याचं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांचे कौतुक केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.