Maharashtra Politics: पुणे-मुंबई-ठाण्यात महायुती तुटली? निवडणुकीआधीच ब्रेकअप?

Mahayuti Split Ahead Of Civic Polls: महापालिका निवडणुका जाहीर होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र त्यापुर्वीच महायुतीनं महापालिकांबाबतची आपली रणनीती ठरवलीय. नेमकी काय आहे ही रणनीती? तिन्ही पक्ष कुठे एकत्र लढणार आणि कुठे स्वतंत्र लढणार?
Mahayuti leaders discussing the final civic poll formula during the coordination committee meeting in Nagpur.
Mahayuti leaders discussing the final civic poll formula during the coordination committee meeting in Nagpur.Saam Tv
Published On

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे...मात्र महायुतीचे नेते महापालिका निवडणुकीच्या तयारीत गुंतलेत... नागपूरमध्ये महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली... याच बैठकीत महापालिका निवडणुकीसाठींचा फॉर्म्युला ठरला असला तरी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि ठाण्यात महायुती तुटणार अशी चर्चा रंगलीय....मात्र कोणत्या महापालिकांमध्ये युती होणार आणि कुठे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे...

महायुतीचा फॉर्म्युला ठरला?

भाजप-शिंदेसेना एकत्र?

मुंबई

ठाणे

कल्याण-डोंबिवली

नाशिक

नागपूर

भाजप, राष्ट्रवादी स्वबळावर?

पुणे

पिंपरी-चिंचवड

नवी मुंबई

अजून निर्णय नाही

एका बाजूला नेते महायुतीत लढण्यावर ठाम असल्याचं चित्र दिसतंय... तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि आपली ताकद दाखवण्यासाठी भाजप मुंबई आणि ठाण्यात शिंदेंना सोडून तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना सोडून निवडणूक लढवण्याची चाचपणी करत आहे... त्यामुळे गरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीप्रमाणेच महायुतीतील पक्षांमध्येच लढत झाल्यास महाविकास आघाडीवरील चर्चेचा फोकस बदलता येईल.. त्यासाठीच महायुती आधी ब्रेकअप नंतर पॅचअप अशी रणनीती आखणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com