Maharashtra Politics : पालिका निवडणुकीत एकमेकांवर तुटून पडतात, निवडणूक होताच... सोशल मीडियावर नेत्यांविरोधात जनतेचा संताप

Hingoli Political News : हिंगोलीतील आमदार संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळे यांचा अधिवेशनात हसतमुख घेतलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून निवडणुकीत केलेल्या चिखलफेकीची आठवण करून देत नेटकऱ्यांनी दोन्ही नेत्यांना जोरदार ट्रोल केले आहे. या प्रकरणावर राज्यभरात चर्चा रंगली आहे.
Maharashtra Politics : पालिका निवडणुकीत एकमेकांवर तुटून पडतात निवडणूक होताच... सोशल मीडियावर नेत्यांविरोधात जनतेचा संताप
Hingoli NewsSaam Tv
Published On
Summary
  • दोन हिंगोली आमदारांचा हसतमुख फोटो व्हायरल झाल्याने ट्रोलिंगची लाट

  • निवडणुकीत चिखलफेक; अधिवेशनात दोस्ती पाहून नेटकऱ्यांचा संताप

  • जिल्ह्यातील पाणी, उद्योग, विकास प्रश्नांवर निष्क्रियतेची टीका

  • सोशल मीडियावर “भांडण हिंगोलीत, मौज नागपूरात” असा जोरदार रोष

संदीप नागरे, हिंगोली

सद्या हिंगोली जिल्ह्यातील दोन लोकप्रतिनिधींना राज्यभरात सोशल मीडियात ट्रोल केल्या जात आहे, कळमनुरी विधानसभेचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर व हिंगोली विधानसभेचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या एका फोटोचा संदर्भ देत सोशल मीडियावर पोस्ट करत नेटकऱ्यांनी कमेंट स्वरूपात त्यांचा चांगला समाचार घ्यायला सुरुवात केली आहे आणि याला कारणही तसंच आहे.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान या दोन्ही नेत्यांनी प्रचारात एकमेकांवर केलेली चिखलफेक खाजगी आयुष्यावर केलेले बेताल वक्तव्य याचा दाखला देण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांनी मात्र आता निवडणूक संपली की, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात दिलखुलास चर्चा करत चेहऱ्यावर हलकीशी स्माईल देत काढलेले फोटो, यामुळे सोशल मीडियात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.

Maharashtra Politics : पालिका निवडणुकीत एकमेकांवर तुटून पडतात निवडणूक होताच... सोशल मीडियावर नेत्यांविरोधात जनतेचा संताप
Metro Ticket App News : रांगेची कटकट संपली! मेट्रो प्रवाशांना १४ अ‍ॅपवरून तिकीट काढता येणार; काय आहे नेमकी सुविधा?

महाराष्ट्राच्या मराठवाड्यात सर्वाधिक मागासलेला जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे, या जिल्ह्यात कयाधू नदीच्या पाण्याचा मोठा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. उद्योग उभारणीसाठी हिंगोलीच्या तरुण व्यावसायिकांसाठी एमआयडीसीमध्ये इंचभर जागा देखील उपलब्ध नाही. मात्र अशा परिस्थितीत महायुतीत निवडणूक एकत्र लढलेले दोन आमदार पालिका निवडणुकीत एकमेकांवर तुटून पडतात आणि निवडणूक झाली की, अंगावर सोंगेची पांघरुण घेतलेली घोंगडी अलगद बाजूला काढतात. असा मजकूर टाकून नेटकरी या दोन लोकप्रतिनिधींवर अक्षरशः तुटून पडले आहेत.

Maharashtra Politics : पालिका निवडणुकीत एकमेकांवर तुटून पडतात निवडणूक होताच... सोशल मीडियावर नेत्यांविरोधात जनतेचा संताप
Crime : लाथाबुक्क्यांनी मारलं, चाकूने वार केला, अहिल्यानगरमध्ये पैशांच्या वादातून तरुणाची हत्या

विशेष म्हणजे निवडणुकीदरम्यान दोन्ही लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते मात्र प्रचारादरम्यान समोरासमोर आल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. त्यामुळे हिंगोलीत भांडण लावून नागपूर मध्ये दोन आमदार महोदय मौजमजा करत असल्याचे देखील सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या मेसेज मध्ये म्हटलं आहे. या सर्व प्रकारची राज्यभरात वेगळी चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com