प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी 200 हून अधिक चित्रपटात काम केले आहे.
अभिनेत्याला 2022 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता.
मनोरंजनसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते श्रीनिवासन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. श्रीनिवासन हे अभिनयासोबतच एक उत्तम चित्रपट निर्माते, लेखक देखील होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. मीडिया रिपोर्टनुसार, 20 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
श्रीनिवासन यांचा जन्म केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील थलासेरीजवळील पट्ट्यम येथे झाला. श्रीनिवासन यांनी त्रिपुनिथुरा तालुका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. श्रीनिवासन यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रीनिवासन यांच्या पश्चात त्यांचा कुटुंबाता मुलगा (अभिनेता, दिग्दर्शक विनीत श्रीनिवासन आणि ध्यान श्रीनिवासन) आणि बायको विमला आहे. श्रीनिवासन यांना मार्च 2022 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. श्रीनिवासन यांच्या निधनाची बातमी ऐकताच चाहते आणि कलाकारांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
श्रीनिवासन यांना आपल्या कामासाठी अनेक मोठ्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांना 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते मानले जाते. त्यांनी आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांनी 200 अधिक चित्रपट केले आहे. तसेच पटकथा लिहिल्या आहेत. त्यांनी 'चिंतविष्ठय श्यामला', 'वदकुनोक्कैयंतरम' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. जून 2025 मध्ये रिलीज झालेल्या नॅन्सी राणी' या चित्रपटात ते शेवटचे दिसले. त्यांनी आपल्या मुलांसोबतही काम केले आहे.
1977 मध्ये रिलीज झालेला 'मणिमुझक्कम' हा श्रीनिवासन यांचा पहिला चित्रपट होता. त्यांचे मल्याळम इंडस्ट्रीत मोठे नाव आहे. त्यांनी 'ओदारुथमवा अलारियाम' या चित्रपटाचे पटकथा लेखन केले आहे. त्यांच्या 'वादक्कुनोक्कियंथरम ' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला . तर 'चिंताविष्टय्या श्यामला'ला सामाजिक मुद्द्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.