Actress Mother Death  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Actress Mother Death : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन, बॉलिवूडवर शोककळा

Famous Bollywood Actress Mother Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अभिनेत्रीच्या आईचे निधन झाले आहे.

Shreya Maskar

मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डोक्यावरचे मातृछत्र हरपले.

अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

बॉलिवूडमधून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खानच्या आईचे म्हणजे परवीन खान यांचे निधन झाले आहे. झरीन खानच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. परवीन खान यांचे बुधवारी मुंबईत दीर्घकालीन आजाराशी लढा दिल्यानंतर निधन झाले. कुटुंबाने एक संक्षिप्त अधिकृत निवेदन जारी करून या बातमीला दुजोरा दिला. अंत्यसंस्कार आज, ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील वर्सोवा येथे पार पडले.

कुटुंबाने शेअर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही हे कळवू इच्छितो की, आमची प्रिय श्रीमती परवीन खान ( झरीन खान आणि सना खान ) यांच्या आईचे ८ एप्रिल रोजी निधन झाले. " तसेच या कठीण काळात कुटुंबाच्या Privacy चा आदर करण्याची विनंती केली आहे. परवीन खान यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड सेलिब्रेटी, नेटकरी यांनी अभिनेत्रीच्या आईवर श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूडवर शोककळा पसरली.

Zareen khan mother parveen khan death

झरीन खानच्या आईची तब्येत खूप वेळापासून बिघडली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. झरीन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून आईच्या प्रकृतीचे हेल्थ अपडेट देत होती. आईच्या निधनाच्या अवघ्या एक दिवस आधीच, झरीन खानने आपली लाडकी पाळीव मांजर 'रॅम्बो' ला देखील गमावले. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर रॅम्बोचा एक फोटो शेअर केला होता.

झरीन खान वर्कफ्रंट

झरीन खानने २०१० मध्ये सलमान खानच्या 'वीर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. झरीन खानचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. तिने सलमान खानच्या 'रेडी' चित्रपटातही काम केले आहे. त्यानंतर झरीन खान 'हाऊसफुल २', 'हेट स्टोरी ३', 'वीरप्पन', 'अक्सर २', '१९२१', 'डाका', 'चाणक्य', 'जट्ट जेम्स बाँड' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT