Satish Daud
बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान बऱ्याच दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे.
जरीन खानने 'वीर' या हिंदी चित्रपटातून चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.
अभिनेता सलमान खानच्या सोबत असलेला जरीनचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
त्यानंतर जरीन खान हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त दक्षिण आणि पंजाबी चित्रपटांमध्येही झळकली होती.
मात्र, काही वर्षांपासून जरीन खानने एकाही चित्रपटात काम केलेलं नाहीये.
बॉलिवूडमधून दूर असली, तरी जरीने नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
जरीन खानने नुकतेच इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये जरीनने निळ्या रंगाचा ड्रेस घातला असून वेगवेगळ्या पोज देताना दिसून येत आहे.
जरीन खानचा हा नवीन लूक चाहत्यांच्या मनाला खूपच भावला आहे. अनेकांनी या फोटोंवर तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.