Elvish Yadav-Engaged 2  saam tv
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav-Engaged 2 : महिलेचा टी-शर्ट काढला, आंघोळ घातली अन्...; एल्विश यादवच्या शोमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEOS पाहून नेटकरी भडकले

Engaged season 2 Video : एल्विश यादवच्या 'एंगेज्ड सीझन २' शोवर प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत. शोमधील Physical टास्कचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

एल्विश यादवचा 'एंगेज्ड सीझन २' शो सध्या चांगलाच चर्चेत आहे.

'एंगेज्ड सीझन २'मध्ये नुकतेच Physical टास्क पार पडले.

'एंगेज्ड सीझन २' शो पाहून प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत.

'बिग बॉस ओटीटी सीझन २' चा विजेता एल्विश यादव सध्या त्याच्या 'एंगेज्ड सीझन २' शोमुळे चांगलाच चर्चेत आहे. हा शो पाहून नेटकी संताप व्यक्त करताना दिसत आहे. हा शो जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळतो. या शोच्या दुसऱ्या सीझनची सुरूवात 2026 च्या व्हॅलेंटाईन डेला(14 फेब्रुवारी) झाली. या शोचे सूत्रसंचालन एल्विश यादव आणि अभिनेत्री जिया शंकर करत आहे. हा प्रेमाचा रोमँटिक शो आहे. प्रेम वेडे, प्रेम शोधणारी तरुणाई येथे पाहायला मिळत आहे,

'एंगेज्ड सीझन २' शोमध्ये अलिकडेच Physical टास्क दाखवण्यात आले. जे पाहून प्रेक्षक चांगलेच भडकले. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यात केमिस्ट्री, रोमान्स पाहायला मिळत आहे. Physical टास्क दरम्यान लॅप डान्स राउंड, आइस क्यूब टास्क आणि मड चॅलेंज पाहायला मिळाली.

Physical टास्क

'एंगेज्ड सीझन २' एका टास्कमध्ये एक मुलगा तोंडात बर्फ धरून एका महिलेच्या शरीरावर चोळताना दिसत आहे. मड चॅलेंजचा व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेवर चिखल फेकण्यात आला आणि तो चिखल साफ करण्याचा टास्क एका मुलाला दिला. व्हिडीओत मुलगा त्या महिलेला आंघोळ घालताना दिसत आहे. एकीकडे एका महिला स्पर्धकाला मुलाच्या मांडीवर लॅप डान्स करायला सांगतात. तर दुसरीकडे त्याच मुलाला मुलीचे शर्ट काढायला लावतात.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

'एंगेज्ड सीझन २'मधील Physical टास्क पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. त्यांनी शोला, एल्विश यादवला ट्रोल केले आहे. तसेच शोमधील स्पर्धकांवर प्रश्न केले आहेत. एका युजरने लिहिलं की, "किती घाण...यांना लाज आहे का?", दुसऱ्या युजरने लिहिलं की, "अशा शोचा आमच्या मुलांवर वाईट परिणाम होत आहे...शो आता बंद करा..." तिसऱ्या युजरने लिहिलं की, "प्रसिद्धीसाठी, शोसाठी आजकालची तरुण पिढी कोणत्याही थराला जाताना दिसत आहे" नेटकऱ्यांनी या 'एंगेज्ड सीझन २'ला अश्लील शो घोषित केले आहे.

'एंगेज्ड सीझन २' चे स्पर्धक

'एंगेज्ड सीझन २'या शोमध्ये सध्या 10 स्पर्धक पाहायला मिळत आहेत. यात अंश कुकरेजा, देव करण, विश्वजीत घोष, कृती वर्मा, हिमांशी शर्मा, आचमन शर्मा, दीपांगना दास, इरम सय्यद, उन्नती पटवाल आणि मन्नत कुल्हारिया यांचा समावेश आहे. यात तीन वाइल्ड कार्ड स्पर्धक देखील आहेत. ज्यांची नावे निखिल मलिक, देवांशी शर्मा आणि यशपाल सिंग अशी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT