Shreya Maskar
चेहऱ्यावर बर्फ लावल्यानंतर चेहरा मुलायम, चमकदार, हायड्रेट होतो. त्यामुळे लोक आवर्जून हा प्रयोग करतात. मात्र हिवाळ्यात बर्फ लावण्याचे नुकसान देखील आहेत.
थंडीत चेहऱ्याला बर्फ लावल्यामुळे, बर्फाचा अति वापर केल्यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होतात.
चेहऱ्यावर जास्त प्रमाणात बर्फ लावल्याने चेहरा खूप थंड होतो आणि त्यावर फोडी येतात.
चेहऱ्यावर अति बर्फ लावल्यामुळे पुरळ येऊ शकते. जास्त संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी हिवाळ्यात चेहऱ्यावर बर्फ लावणे टाळा.
सायनस आणि मायग्रेनने त्रस्त असलेल्या लोकांनी चेहऱ्यावर बर्फ चोळणे टाळा. बर्फामुळे त्रास आणखी वाढतो. डोके दुखायला लागते.
चेहऱ्याला बर्फ लावत असाल तर १०-१५ मिनिटांच्यावर चेहऱ्याला बर्फ चोळू नये. त्यामुळे चेहरा लाल होतो.
चेहऱ्यावर बर्फ लावल्यानंतर चेहरा कोरड्या सुती कपड्याने पुसून घ्या. तसेच बर्फ लावल्यानंतर चेहरा न विसरता मॉइश्चराइजर लावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.