श्रद्धा कपूर कोल्हापूरला पोहचली.
श्रद्धाने कोल्हापूरमधील अंबाबाई देवीचे दर्शन घेतले आहे.
श्रद्धाच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूरमध्ये सुरू आहे.
बॉलिवूडची सुपरस्टार श्रद्धा कपूर कायम आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या श्रद्धा तिचा आगामी चित्रपट 'ईथा' (Eetha) च्य शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा एक बायोग्राफिकल चित्रपट आहे. यात श्रद्धा कपूरसोबत बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत. अशात आता श्रद्धा कपूर कोल्हापूरला स्पॉट झाली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. श्रद्धा कपूर देवीच्या दर्शनाला थेट कोल्हापूरला पोहचली आहे. श्रद्धा कपूरने कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले आहे. आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग निमित्त ती कोल्हापूरला गेली आहे. तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाचे शूटिंग सध्या कोल्हापूरमध्ये सुरू आहे.
श्रद्धा कपूरला पाहण्यासाठी चाहत्यांनी मंदिराबाहेर गर्दी केली. मंदिरात दर्शन घेताना श्रद्धा कपूरसोबत मराठी अभिनेता आनंद काळे देखील दिसला. आनंद काळे यांनी आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट यांमध्ये आपला दमदार अभिनय दाखवला आहे. श्रद्धा कपूर मंदिरात पारंपरिक ड्रेसमध्ये दिसली. तिने अंबाबाईची ओटी भरली आणि देवीचे आशीर्वाद घेतले.
'ईथा' चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकारणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'ईथा' चित्रपट 2027 ला रिलीज होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात आहे. व्हिडीओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहे. श्रद्धा कपूरचे साधे राहणीमान आणि प्रेमळ स्वभावाचे कौतुक होत आहे. चाहते आता 'ईथा' चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.