Shraddha Kapoor : बँड बाजा बारात! यंदा श्रद्धा कपूर लग्न करणार? 'त्या' एका कमेंटने चाहत्यांमध्ये चर्चा

Shraddha Kapoor Wedding : श्रद्धा कपूरने आपल्या लग्नाबद्दल चाहत्यांना मोठी हिंट दिली आहे. ती 2026 मध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोले जात आहे.
Shraddha Kapoor Wedding
Shraddha Kapoorsaam tv
Published On
Summary

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत आहे.

श्रद्धा कपूर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

श्रद्धा कपूरने एक कमेंट करून आपल्या लग्नाची माहिती चाहत्यांना दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायम आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत असते. खूप वेळापासून तिचे नाव राहुल मोदीसोबत जोडले जात आहे. दोघे अनेक वेळा एकत्र स्पॉट होतात. त्याची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. श्रद्धा कपूर ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे चित्रपट सुपरहिट होतात. तिच्या अभिनयाचे आणि साध्या स्वभावाचे चाहते दिवाने आहेत.

श्रद्धा कपूरचे लग्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या सुंदर लूकचे फोटो आणि प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांसोबत शेअर करते. तिचे इन्स्टाग्राम 94.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती कायम चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. अलिकडेच तिच्या एका पोस्टवर चाहत्याने विचारले की, "श्रद्धा कपूर तू लग्न कधी करणार?" यावर श्रद्धा कपूरने उत्तर दिले आहे. ती म्हणाली की, "हो! मी करेन, मी लग्न करणार..."

श्रद्धा कपूरने दिलेल्या या उत्तरामुळे सध्या तिच्या लग्नाची चर्चा चांगली रंगली आहे. श्रद्धा कपूर नवीन वर्षात 2026 मध्ये विवाह बंधनात अडकणार असल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप यासंबंधित कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. श्रद्धा कपूर लवकरच 'ईथा' (Eetha), नागिन (Naagin) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2026 मध्ये श्रद्धा कपूर अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी अलिकडेच मुंबई कॉफी फेस्टिव्हलमध्ये फूड स्टॉल्स फिरताना दिसले. तिथे श्रद्धाने मोची (एक जपानी गोड पदार्थ) राहुल मोदीला आपल्या हाताने खाऊ घातला. चाहते श्रद्धा कपूर आणि राहुल मोदीच्या जोडीला भरभरून प्रेम देत आहेत.

Shraddha Kapoor Wedding
Irrfan Khan Birth Anniversary : इरफान खानने वाचवला होता जीव; आज 'तो' आहे IPS ऑफिसर, नेमका किस्सा काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com