आज दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा वाढदिवस आहे.
इरफान खान यांच्या अभिनयाचे , चित्रपटांचे आजही चाहते दिवाने आहेत.
इरफान खानने आपल्या जीव धोक्यात घालून लहानपणी आपल्या मित्राला वाचवले होते.
दिवंगत बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचा आज (7 जानेवारी 2026) वाढदिवस आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यांच्या अभिनयाचे आजही चाहते दिवाने आहेत. त्याचा अभिनय अव्वल दर्जाचा होता. त्यांनी आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकली.
इरफान खान आता या जगात नाहीत. पण त्यांच्या आठवणी आणि किस्से कायम चर्चेत असतात. त्यांचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी राजस्थानातील टोंक जिल्ह्यात झाला. त्याच्या एक हृदयस्पर्शी किस्सा जाणून घेऊयात. इरफान खानने मित्राचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. तो मुलगा आता आयपीएस अधिकारी बनला आहे. ज्याचे नाव हैदर अली जैदी आहे. त्यांनी हा किस्सा सांगितला होता.
एका मुलाखतीत हैदर अली जैदी यांनी मित्राच्या आठवणीत सांगितल्यानुसार, इरफान खान आणि हैदर अली जैदी हे दोघे लहानपणापासून मित्र होते. शाळा आणि कॉलेजमध्ये एकत्र गेले. एके दिवशी दोघे कॉलेजमधून घरी परत येत होते. तेव्हा हैदरला विजेचा झटका बसला. त्यावेळी कोणीही मदतीला आले नव्हते. तेव्हा इरफान खानने पुढे होऊन हैदरचा जीव वाचवला. इरफानने हैदरला विजेच्या शॉकपासून दूर केले.
इरफान खान यांचे निधन 29 एप्रिल 2020 साली झाले. 'पिकू', 'हिंदी मीडियम', 'द लंचबॉक्स' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.