Mahaparinirvan Release Date Declared Instagram
मनोरंजन बातम्या

Mahaparinirvan: 'महापरिनिर्वाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा...

Prasad Oak Film Mahaparinirvan: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेरात टिपलेले फोटोग्राफर नामदेवराव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित 'महापरिनिर्वाण' चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली आहे.

Chetan Bodke

Mahaparinirvan Release Date Declared

शोषित- वंचितांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाने अवघा देश हळहळला होता. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून सर्वांनीच हंबरडा फोडला होता. त्यांच्या अंत्ययात्रेला लाखोचा जनसमुदाय लोटला होता. त्यांच्या अनुयायांच्या हुंदक्यांच्या टाहोने मुंबापुरीचा आसमंत व्यापला होता आणि या सगळ्या प्रसंगांचे एकमेव साक्षीदार होते नामदेवराव व्हटकर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेरात टिपलेल्या या नामदेवराव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित 'महापरिनिर्वाण' चित्रपटाची गेल्या वर्षी घोषणा करण्यात आली होती. चित्रपटाचा आतापर्यंत मोशन पोस्टर आणि टीझर रिलीज झाला होता. आता नुकताच निर्मात्यांकडून चित्रपटाचा मुख्य पोस्टर रिलीज करत चित्रपटाच्या प्रदर्शनची तारीख जाहीर केली आहे.

ज्यावेळी दिग्दर्शक प्रसाद ओककडून चित्रपटाची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनची तारीख जाहीर झाली आहे. शैलेंद्र बागडे दिग्दर्शित 'महापरिनिर्वाण' चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘महापरिनिर्वाण दिनी’ घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना व घटनांचा उलगडा करणाऱ्या नामदेवराव व्हटकर यांची भूमिका प्रसाद ओक यांनी साकारली असून अंजली पाटील, कमलेश सावंत, गौरव मोरे हे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत. (Dr. Babasaheb Ambedkar)

नुकतंच प्रसाद ओकने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर चित्रपटाचा एक पोस्टर शेअर केलेला आहे. या शेअर केलेल्या पोस्टला त्याने कॅप्शन दिले की, “गोष्ट लोकांना स्वप्न देणाऱ्या महामानवाच्या परिनिर्वाणाची... 'महापरिनिर्वाण एक कथा दोन इतिहास...' ६ डिसेंबर २०२४ पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!” असं कॅप्शन देत त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. त्या पोस्टरमध्ये, दादर चौपाटीवर लोटलेला कोट्यवधींचा समुदाय पाहायला मिळत आहे. बाबासाहेब आंबडेकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रस्त्यावर उतरलेला जनसागर नामदेवराव व्हटकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. जवळपास ३००० फुटांची रिळ व्हटकर यांनी तयार केली. (Marathi Film)

नामदेवराव व्हटकर यांच्याविषयी सांगायचे तर, ते स्वतः उत्तम कॅमेरामॅन, दिग्दर्शक, निर्माते होते. त्यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात अनेक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसे ते राजकीय विश्वातही बरेच सक्रिय होते. ते आमदारही झाले आहेत. त्यांचा जीवनप्रवास या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे. (Mahaparinirvan Din)

‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता प्रसाद ओक, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत , विजय निकम , हेमल इंगळे आणि कुणाल मेश्राम यासारखे नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म प्रोडक्शन निर्मित 'महापरिनिर्वाण' या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेंद्र बागडे यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके आहेत, तर सहनिर्माते आशिष ढोले आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पहिला कल मविआच्या बाजूने

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT