Diwali Special Offer: on Boyz 4 Watch Only in 99 Rs Gaurav More's Marathi Film Boyz 4 Movie - Instagram
मनोरंजन बातम्या

Boyz 4 Movie: दिवाळी धमाका! मराठी प्रेक्षकांसाठी जबरदस्त मेजवाणी, गौरव मोरेचा 'बॉईज ४' पाहा येणार फक्त ९९ रुपयांता

Diwali Special Offer on Boyz 4 Movie: पहिल्या ३ भागांप्रमाणे 'बॉईज' चित्रपटचा चौथा भागातही प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे.

Priya More

Boyz 4 Box Office Collection:

नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'बॉईज ४' चित्रपट (Boyz 4 Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा 20 ऑक्टोबरला संपली. हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला चांगली पसंती मिळत आहे.

पहिल्या ३ भागांप्रमाणे 'बॉईज' चित्रपटचा चौथा भागातही प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रक्षेक थिएटरमध्ये मोठी गर्दी करत आहेत. अशामध्ये 'बॉईज ४' न पाहिलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'बॉईज ४' चित्रपट दिवाळीनिमित्त खास ऑफर घेऊन आला आहे. मराठी चित्रपटप्रेमींसाठी ही खास मेजवाणी असणार आहे. कारण त्यांना फक्त ९९ रूपयांमध्ये हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही फॅमिलीसोबत हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. यासंदर्भात गौरव मोरेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. या जबरदस्त ऑफरमुळे चित्रपटप्रेमी आनंदी झाले आहेत.

गौरव मोरेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बाईज ४' चित्रपटाच्या दिवाळी ऑफरसंदर्भात पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये गौरवने असे लिहिले आहे की, 'दिवाळी स्पेशल ऑफर! एजॉय करा बॉईज-४ आता फक्त रु ९९/ - मध्ये...' 'बॉईज ४' चित्रपट प्रेक्षकांना फक्त ९९ रुपयांत पाहायला मिळणार हे कळताच ते खूपच आनंदीत झाले आहेत. ज्यांनी आतापर्यंत हा चित्रपट पाहिला नाही त्यांच्यासाठी ही खास संधी असणार आहे. आता तुम्ही जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट फक्त ९९ रूपयांमध्ये पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

'बॉईज ४' चित्रपटाने रिलीज झाल्यापासून ते आतापर्यंत ४.२० कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम पाहून हा चित्रपट सुपरहिट ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचसोबत दिवाळी ऑफरमुळे हा चित्रपट आणखी चांगली कमाई करेल यात काही शंका नाही. या चित्रपटामध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातून धैर्या, ढुंग्या आणि कबीरची गँग प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : ए डुबे देख; संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

Rasgulla Recipe: मऊसूत आणि टेस्टी रसगुल्ला घरच्या घरी बनवा फक्त ३० मिनिटांत

SCROLL FOR NEXT