Manasvi Choudhary
हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्व आहे.
धनत्रयोदशी म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवसांपासून ते भाऊबीजपर्यंत या सणाचा उत्साह असतो.
दिवाळी या सणाला सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. घराला कंदील , आकर्षक विद्युत रोषणाई, रांगोळी तसेच मातीच्या दिव्यांनी सजवले जाते.
दिवाळीत घरामध्ये मातीचे दिवे लावण्याची पद्धत फार जुनी आहे.
पौराणिक कथेनुसार, प्रभू राम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत आले होते. या दिवशी संपूर्ण अयोध्येत रांगोळी आणि दिवे लावून जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले होते.
कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळी या सणाला मातीचे दिवे लावले जातात.