Manasvi Choudhary
दिवाळीच्या काही दिवसांआधीच दिवाळीचा फराळ बनवायला घरोघरी सुरूवात होते.
दिवाळीच्या फराळातील सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे चकली
कुरकरीत चकली तयार करण्यासाठी सर्वात आधी चकली भाजणी तयार करून घ्या.
चकली भाजणीसाठी प्रमाणानुसार तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, धने आणि जिरे घ्या.
सर्वप्रथम तांदूळ, हरभरा डाळ व उडीद डाळ भाजून त्यामध्ये भाजलेले धन, जिरे घालून सर्व बारिक दळून घ्या.
एका भाड्यांत चकली भाजणी प्रमाणानुसार, लाल तिखट, तीळ, ओवा ,आणि चवीनुसार मीठ यांचे मिश्रण करून घ्या.
कढईमध्ये जेवढं पीठ तेवढं पाणी उकळून घ्या. त्यानंतर यामध्ये भाजणीचे पीठ आणि सर्व मसाले टाकून व्यवस्थित उकड काढून घ्या.
मिश्रण गार झाल्यावर मळून घ्या नंतर चकलीच्या साच्याला आतून तेल लावून साच्यात मिश्रण घालून गोलाकार चकल्या पाडा.
चकल्या तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवून तेल चांगलं गरम करून. गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि एक-एक चकली टाकून तळून घ्या.