Bollywood Couples Celebrate The First Diwali Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bollywood Couples Celebrate The First Diwali: परिणीती- राघवसह आथिया- राहुल सेलिब्रेट करणार लग्नानंतरची पहिली दिवाळी, जाणून घ्या एकाच क्लिकवर...

Diwali 2023 Bollywood Couples News: बी- टाऊनमध्ये असे काही जोडपी आहेत, जे लग्नानंतरची पहिली दिवाळी सेलिब्रेट करीत आहेत.

Chetan Bodke

Bollywood Couples Celebrate The First Diwali

दिवाळी सण प्रत्येकासाठी खास असतो. जनसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांसाठीच हा सण खास असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाची दिवाळीही काही सेलिब्रिटींसाठी खास असणार आहे. बी- टाऊनमध्ये असे काही जोडपी आहेत, जे लग्नानंतरची पहिली दिवाळी सेलिब्रेट करीत आहेत.

मध्यंतरी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले होते. त्यांची या वर्षीची ही लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. चला तर एक नजर टाकूया, अशा सेलिब्रिटी कपल्सवर जे यंदाच्या वर्षी लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करणार आहेत.

दाक्षिणात्य अभिनेत्री लावण्या त्रिपाठी आणि वरुण तेज यांनी १ नोव्हेंबर २०२३ रोजी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांची ही लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. परिणीती आणि राघव यांची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे.

'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सहगलनेही जून २०२३ मध्ये बॉयफ्रेंड आशिष सजनानीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ही जोडी पहिलीच दिवाळी साजरी करणार आहे.

बॉलिवूडचे क्यूट कपल कियारा आणि सिद्धार्थ सुद्धा लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करीत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ कियाराने दिल्लीमध्ये करवा चौथ साजरी केली. त्यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांनी ६ जानेवारी २०२३ ला स्पेशल मॅरेज ॲक्टच्या अंतर्गत कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर या जोडप्याने एका गोंडस बाळालाही जन्म दिला आहे. स्वरा- फवाद आपल्या गोंडस लेकीसोबत पहिलीच दिवाळी साजरी करीत आहेत.

क्रिकेटर के.एल.राहुल आणि सुनील शेट्टीची लेक आथियाने जानेवारी २०२३ मध्ये सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली होती. इतर सेलिब्रिटी जोडींप्रमाणे ही जोडी सुद्धा लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरा करीत आहेत.

टॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानीने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये सोहेल खातुरियासोबत जयपूरमधील मुंडोटा फोर्टमध्ये लग्नगाठ बांधली होती. इतर सेलिब्रिटींप्रमाणे ही जोडी सुद्धा लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरा करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT