Dhadak 2 Poster Saam TV
मनोरंजन बातम्या

Dhadak 2 Movie Promo: करण जोहरने केली 'धडक २'ची घोषणा, चित्रपटातून जान्हवीचा पत्ता कट; आता चित्रपटात झळकणार ‘ही’ अभिनेत्री

Dhadak 2 Movie Announcement: 'सैराट' प्रमाणेच 'धडक' चित्रपटातले गाणेही सोशल मीडियावर प्रचंड गाजले. तब्बल ६ वर्षांनंतर 'धडक'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे.

Chetan Bodke

मराठी सिनेसृष्टीमध्ये २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सैराट' चित्रपटाचा फक्त भारतातच नाही तर जगभरात डंका वाजला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची रेकॉर्ड ब्रेक कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडित काढले.

२०१८ मध्ये या चित्रपटाचा हिंदी रिमेक बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या चित्रपटातून श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर हिने बॉलिवूड पदार्पण केलं होतं. आता लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच निर्मात्यांनी चित्रपटाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केलेला आहे.

'सैराट' प्रमाणेच 'धडक' चित्रपटातले गाणेही सोशल मीडियावर प्रचंड गाजले होते. तब्बल ६ वर्षांनंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. 'धडक'मध्ये प्रमुख भूमिकेत जान्हवी कपूर आणि इशान खट्टर होते. पण आता 'धडक २'मध्ये जान्हवी आणि इशान दिसणार नाही. त्यांच्या ऐवजी मुख्य भूमिकेत 'ॲनिमल' फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि सिद्धार्थ चतुर्वेदी दिसणार आहेत. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन शाझिया इकबाल करणार आहेत. नुकताच चित्रटाची पहिली झलक निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली आहे.

“यह कहानी है थोडी अलग क्यूंकि एक था राजा, एक थी रानी – जात अलग थी… खतम कहानी” असं कॅप्शन देत निर्मात्यांनी 'धडक २' चा प्रोमो शेअर केलेला आहे. व्हिडीओमध्ये निर्मात्यांनी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ही जाहीर केली आहे. हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ ला रिलीज होणार आहे. झी स्टुडिओज, धर्मा प्रोडक्शन आणि क्लाउड ९ पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. 'सैराट' चित्रपटाप्रमाणेच 'धडक' चित्रपटाचेही कथानक आहे. जातीयवादात अडकलेल्या प्रेमावर भाष्य करण्यात आले. आता पुन्हा एकदा 'धडक २'मध्येही निर्माता करण जोहर जाती व्यवस्थेवर भाष्य करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT