फराह खानने सांगितलं चित्रपटाच्या सेटवर कलाकारांमध्ये अफेअर का होत
ग्लॅमर किंवा आकर्षणामुळे" नव्हे, तर इमोशन्स आणि परिस्थितीमुळे अफेअर
ओढ निर्माण होणे हे नैसर्गिक आहे, असं फराह म्हणाली
Farah Khan on Actors Affairs : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शका, निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खान यांनी अलीकडेच एका मुलाखतीत चित्रपटाच्या सेटवर कलाकारांमध्ये अफेअर होण्यामागील कारणांवर चर्चा केली आहे. 'एकटेपणा, लांब वेळाचं शूटिंग आणि इमोशनल जवळीक' हे प्रमुख घटक असतात असे फराह खान यावेळी म्हणाली.
फराह खानने या विषयावर बोलताना सांगितले, “अनेकदा कलाकारांना परदेशात किंवा दूरच्या ठिकाणी महिन्याभरासाठी शूटिंगसाठी जावं लागतं. सेटवर लांब वेळ घालवताना त्यांना एकटेपणा जाणवतो. सतत एकाच व्यक्तीसोबत वेळ घालवला जातो, त्यामुळे आपोआप जवळीक निर्माण होते आणि त्यातून अफेअर सुरू होतं.”
तिने स्पष्ट सांगितले की, हे सगळं "ग्लॅमर किंवा आकर्षणामुळे" नव्हे, तर इमोशन्स आणि परिस्थितीमुळे घडतं. फराह म्हणाली, “जेव्हा तुम्ही घरापासून लांब असता, सातत्याने काम करत असता, आणि भावनिक आधाराची गरज भासते. तेव्हा तुम्ही ज्या व्यक्तीसोबत सर्वाधिक वेळ घालवत असता, त्याच्याकडे ओढ निर्माण होणे हे नैसर्गिक आहे.”
फराह खान स्वतःने अनेक मोठ्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. जसे, 'मैं हूं ना', 'ओम शांती ओम', 'हॅपी न्यू इयर' तसेच ती अनेक दशकांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. तिच्या मते, फिल्म सेटवर लोक एकत्र काम करतात, एकत्र खातात, झोपतात, चर्चा करतात, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेम भावना निर्माण होते.
फराह खानच्या या स्टेटमेंटमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. काहींनी तिच्या स्पष्ट वक्तेपणाचे कौतुक केले आहे तर काहींनी तिच्या या वक्तव्याला इंडस्ट्रीत होणाऱ्या एक्स्ट्रा अफेअरला डिफेन्स करत असल्याचे म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.