Maharaj Movie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Most Watch OTT Released Films : ओटीटीवर कोणत्या चित्रपटांनी घातला धुमाकूळ? 'या' आहेत मोस्ट वॉच्ड फिल्म; सारा अली खानच्या दोन चित्रपटांचा समावेश

Most Watch OTT Released Films : ओटीटीवर चित्रपटांना रिलीज होण्याची हक्काची जागा देतात. ओटीटीवर अनेक चित्रपटांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैष्णवी राऊत, साम टीव्ही

आधी चित्रपट रिलीज होणं, ते ब्लॉकबस्टर ठरले की आपटले? हे सगळं थिएटरवर अवलंबून होतं. थिएटर मिलन हे चित्रपटाचं भविष्य ठरवायचं की, चित्रपट लोकांपर्यंत पोहोचणार की तसाच गुंडाळला जाणार. पण आता ओटीटीचं जग झालंय. कुठल्याच चित्रपटाला थिएटर मिळवण्यासाठी मरमर करण्याची गरज राहिली नाही आहे. आता त्यातही अनेक ऑप्शन उपलब्ध झालेत. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, सोनी लिव्ह, हॉटस्टार असे एक से बढकर एक ओटीटी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत.

जे चित्रपटांना रिलीज होण्याची हक्काची जागा देतात. सोबतच चित्रपट किती चालला? हिट ठरला कि फ्लॉप? किती लोकांनी पाहिला? असं सर्व समजतं. यापैकी कोणता चित्रपट हिट झाला आणि कोणता नाही, याचं मूल्यांकन चित्रपटाला मिळालेल्या प्रेक्षकसंख्येच्या आधारे केलं जातं. ओमेक्स मीडिया नावाच्या संस्थेनं अशा चित्रपटांची यादी तयार केली आहे, ज्यांनी OTT वर धुमाकूळ घातला. सर्वाधिक लोकांनी ते पाहिले.

Amar Singh Chamkila Movie

कोणते चित्रपट सर्वाधिक लोकांनी पाहिले?

सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांमध्ये सर्वात वरचा चित्रपट म्हणजे 'अमर सिंग चमकीला'. परिणीती चोप्रा आणि पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांनी अभिनय केलेल्या या चित्रपटाला १२.९ दशलक्ष लोकांनी पाहिलं. 'मर्डर मुबारक' या चित्रपटाने दुसरा क्रमांक पटकावला. सारा अली खानच्या या मर्डर मिस्ट्री चित्रपटाला १२.२ मिलियन व्ह्यूअरशिप मिळाली.

Murder Mubarak Movie

'ए वतन मेरे वतन' चित्रपटाला ११.५ प्रेक्षकसंख्या मिळाली. हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा चित्रपट 'महाराज' चौथ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाला १०.६ लोकांनी पाहिलं आहे. 'पटना शुक्ला' नावाचा चित्रपट पाचव्या क्रमांकावर आला, ज्याला ९.८ दशलक्ष दर्शक मिळाले. आणि 8.9 दशलक्ष दर्शकांसह 'भक्त' चित्रपट सहाव्या क्रमांकावर आहे.

Ae Watan Mere Watan Movie

पुढच्या क्रमांकाबद्दल सांगायचं तर 'शर्माजी की बेटी' हा सातव्या क्रमांकावर आहे. आठव्या क्रमांकावर आहे 'सायलेन्स 2: द नाईट आऊल बार शाऊट आउट'. एक मजेशीर गोष्ट म्हणजे तीन चित्रपटांना सारखाच प्रेक्षकवर्ग मिळाला. 'काम चलू है', 'हाऊस ऑफ लाईज' आणि 'ब्लॅक आउट' या तिन्ही चित्रपटांना ४.९ दशलक्ष लोकांनी पाहिलं.

Maharaj Movie

कोणत्या OTT ला लोकांनी जास्त पसंती दिली?

ओटीटी प्लॅटफॉर्मवर या ११ चित्रपटांनी अधिराज्य गाजवलं आहे. पण एक प्रश्न पडतो, नेमकं सगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी कोणत्या OTT ला लोकांनी जास्त पसंती दिली? तर 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित झालेले चित्रपट प्रेक्षकांना सर्वाधिक आवडले. या ११ चित्रपटांच्या यादीत 4 चित्रपट आहेत जे फक्त नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

SCROLL FOR NEXT