OTT Release March 4th Week: हृतिकचा 'Fighter' ते 'ऐ वतन मेरे वतन'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी
OTT Movies and Web Series Released (18- 24 March)
सिनेरसिकांचे दिवसेंदिवस मनोरंजनाचे माध्यम बदलत आहेत. कोव्हिडच्या काळापासून प्रेक्षकांना ओटीटीवर चित्रपट पाहण्याची सवय झाली आहे. प्रेक्षक नेहमीच ओटीटीवर चित्रपटांसोबत वेबसीरिज देखील पाहतातच. (OTT Platform)
वेबसीरिज पाहण्याचा चाहतावर्ग देखील फार मोठा आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला चित्रपट (Films) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातही थिएटरमध्ये रिलीज झालेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
विकेंडला तुम्ही त्या चित्रपटांचा घरबसल्या आनंद लुटू शकता. चला तर जाणून घेऊया या आठवड्यात कोण कोणते चित्रपट रिलीज होणार आहेत. (Bollywood Film)
ऐ वतन मेरे वतन- Ae Watan Mere Watan
सारा अली खान स्टारर 'ऐ वतन मेरे वतन' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. चित्रपटाचे कथानक उषा मेहता यांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी १९४२ मध्ये भारतात पहिलं अंडरग्राऊंड रेडिओ स्टेशन सुरू केलं होतं. या भोवती फिरणारं कथानक आहे. सारा अली खानने चित्रपटात उषा मेहता यांचे पात्र साकारले. चित्रपट येत्या २१ मार्चला 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
फायटर- Fighter
हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' चित्रपट अखेर ओटीटीवर रिलीज होतोय. हा चित्रपट २०२४ या वर्षातील पहिला सुपरहिट चित्रपट ठरलेला आहे. बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. येत्या २१ मार्च २०२४ रोजी 'फायटर' चित्रपट 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
अब्राहम ओजलर- Abraham Ozler
जयाराम आणि ममूटी स्टारर 'अब्राहम ओजलर' हा मल्याळम चित्रपट देखील ओटीटीवर रिलीज होणार आहे. येत्या २० मार्च २०२४ रोजी हा चित्रपट 'डिज्नी प्लस हॉटस्टार' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'अब्राहम ओजलर' हा चित्रपट इन्वेस्टिगेटिव्ह थ्रिलरपट आहे.
लाल सलाम- Lal Salaam
ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित 'लाल सलाम' चित्रपट ९ फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. स्पोर्ट्स ड्रामा आणि ॲक्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत रजनीकांत, विक्रांत आणि विष्णू विशाल हे स्टार आहेत. हा चित्रपट येत्या २२ मार्च रोजी 'नेटफ्लिक्स'वर रिलीज होणार आहे.
माराक्कुमा नेंजन- Marakkuma Nenjam
शालेय जीवनातील आयुष्यावर भाष्य करणारा 'माराक्कुमा नेंजन' हा चित्रपट ही ओटीटीवर रिलीज होणार आहे. मल्टीस्टारर चित्रपट १९ मार्चला ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.