Dhurandhar 2 saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2 : रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2'ची छप्परफाड कमाई, रिलीज आधीच जमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला

Dhurandhar 2 Advance Booking : रणवीर सिंगचा 'धुरंधर 2' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धुरंधर 2' ने रिलीज आधी कोट्यवधी कमावले आहे. कलेक्शनचा आकडा वाचा.

Shreya Maskar

'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला.

आता 19 मार्च 2026 ला 'धुरंधर 2' रिलीज होणार आहे.

'धुरंधर 2' ने रिलीज आधी कोट्यवधींचे ॲडव्हान्स बुकिंग केले आहे.

सध्या सर्वत्र 'धुरंधर 2'ची चर्चा पाहायला मिळत आहे. नुकताच 'धुरंधर 2'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. चित्रपटात रणवीर सिंगचा धमाकेदार ॲक्शन अवताराने सर्वांचे लक्ष वेधन घेतले आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटा 5 डिसेंबर 2025 रिलीज झाला होता. आता 'धुरंधर 2'ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहे. अशात 'धुरंधर 2'च्या ॲडव्हान्स बुकिंगच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.

'धुरंधर 2' ॲडव्हान्स बुकिंग

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर 2' ने पेड प्रिव्ह्यूमध्ये ॲडव्हान्स बुकिंगसाठी 1 लाख 42 हजार तिकिटे विकली गेली आहेत. चित्रपटाने आतापर्यंत 8.83 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे एकूण 6,684 शो आहेत, त्यापैकी 6,457 हिंदीमध्ये आहेत. 1 लाख 35 हजार तिकिटे हिंदीमध्ये विकली गेली आहेत. ब्लॉक सीट्ससह चित्रपटाने 13.25 कोटी कमावले आहेत.

आतापर्यंतची सर्वाधिक ऑक्युपन्सी दिल्ली एनसीआरमध्ये आहे. चित्रपटाने दिल्ली एनसीआर शोमध्ये 13%, मुंबईत 12 % आणि पुण्यात 12 % ऑक्युपन्सी मिळवली आहे. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग पाहता रिलीजसाठी फक्त 10 दिवस शिल्लक असताना, 'धुरंधर 2' चा लवकरच सर्वाधिक अ‍ॅडव्हान्स बुकिंग असलेल्या चित्रपटांमध्ये समावेश होऊ शकतो.

रेकॉर्ड ब्रेक करणार

मीडिया रिपोर्टनुसार, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम', 'बाहुबली २', 'जवान' , 'पठाण' आणि 'स्पायडर-मॅन: नो वे होम' यांचा समावेश आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर 2' चा रनटाइम 3 तास ​​55 मिनिटे असेल. 'धुरंधर' मध्ये अक्षय खन्नाचे पात्र रहमान खलनायक म्हणून मरतो आणि आता अर्जुन रामपाल रणवीरच्या भूमिकेचा सामना करणारा पुढचा खलनायक असेल. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय-थ्रिलरला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंगसोबत सारा अर्जुन, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना हे कलाकार झळकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

Maharashtra News Live Update: बनेश्वर क्षेत्रातील मधमाशांचा वाढता धुमाकूळ, भाविकांच्या जीवितास धोका

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

Kidney health: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी!

SCROLL FOR NEXT