Shreya Maskar
आज (3 मार्च 2026) बॉलिवूडची 'स्त्री' फेम अभिनेत्री श्रद्धा कपूरचा वाढदिवस आहे. आज श्रद्धा 39 वर्षांची झाली आहे. ती एक अभिनेत्रीसोबत यशस्वी बिजनेसवुमन देखील आहे.
श्रद्धा कपूर चित्रपटांसोबत जाहिराती, व्यवसाय, ब्रँड, गुंतवणूक यांच्यामधून बक्कळ पैसा कमावते. 'स्त्री' मधून श्रद्धाने खूप प्रसिद्ध मिळवली.
श्रद्धा कपूर बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची लेक आहे. 2010 मध्ये रिलीज झालेल्या 'तीन पत्ती' चित्रपटात ती दिसली. त्यानंतर 2013 साली रिलीज झालेल्या 'आशिकी २' चित्रपटामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली.
श्रद्धा कपूर ही पालमोनासची सह-संस्थापक आणि ब्रँड ॲम्बेसेडर आहे. जो 2022 मध्ये लाँच केलेला पुणे-आधारित डेमी-फाईन ज्वेलरी ब्रँड आहे. यात सुंदर हार, कानातले आणि अंगठ्या यांचा समावेश आहे.
श्रद्धा कपूर एका चित्रपटासाठी 10-12 कोटीपर्यंत मानधन घेते. तर जाहिरातीसाठी 2-5 कोटी फी घेते. श्रद्धा कपूरचे मुंबईत जुहू येथे अंदाजे 60 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे.
श्रद्धा कपूरकडे लग्जरी कारचे कलेक्शन आहे. यात लेक्सस एलएम, लॅम्बोर्गिनी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज-बेंझ, ऑडी, मारुती सुझुकी, टोयोटा या लग्जरी कार आहेत. ज्यांची किंमत कोटींमध्ये आहे.
श्रद्धा कपूर कायम आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत असते. अनेक काळापासून श्रद्धा कपूरचे नाव राहुल मोदीसोबत जोडले जात आहे. दोघे अनेकदा एकद स्पॉट देखील होतात.
मीडिया रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती जवळपास 130 कोटी रुपये आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 94.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.