Famous Actress  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : "पीरियड्स आले पण वॉशरूमला जायचीही सोय नाही..."; प्रसिद्ध अभिनेत्री मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर तब्बल ९ तास अडकली | VIDEO

Dhanashri Kadgaonkar Stuck On Mumbai Pune Missing link : टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर तब्बल ९ तास अडकली. व्हिडीओ शेअर करून तिने सर्व माहिती सांगितली.

Shreya Maskar

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

प्रसिद्ध अभिनेत्री मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर तब्बल ९ तास अडकली.

प्रवासाच्या काळात अभिनेत्रीला पीरियड्स आले होते पण वॉशरुमला जायची सोय नव्हती.

महाराष्ट्रात गेले ४-५ दिवस मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. ज्यामुळे शाळा-कॉलेजला सुट्टीत देण्यात आली आहे. तसेच रेल्वे ट्रेकमध्ये आणि जागोजागी पाणी साचले. वाहतुक सेवा सर्वच मार्गावर विस्कळीत झाली आहे. ट्रॉफिकमध्ये नागरिक अडकले आहेत. अशात 'घरोघरी मातीच्या चुली' फेम मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर पावसात अडकल्याचा आपला प्रसंग सांगितला आहे.

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. यात वाहतूक कोंडीत अभिनेत्री धनश्री काडगावकर तब्बल ९ तास अडकली. तेव्हा तिचे पीरियड्स सुरू असल्यामुळे तिला खूप त्रास झाला कारण वॉशरुमला जायची कुठेच सोय नव्हती. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

व्हिडीओत अभिनेत्री नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओमध्ये धनश्री बोलते की, "काल मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळली. ट्रॉफिक जाम झाले. पाणी साचले. त्या प्रवाशात मी सुद्धा होते काल. भयंकर ट्रॉफिक आणि धो धो कोसळणारा पाऊस. खरतर काही ट्रॉफिक पोलीस येत होते. मदत करत होते. काही छोट्या गाड्यांना जागा मिळत आहे का तेही बघत होते. पण मिसिंग लिंक इतक्या लवकर कोसळेल असे अजिबात वाटले नव्हते मला. पण मी असे ऐकले याची, दखल घेण्यात आली आहे. ट्रॉफिकमध्ये अडकल्यावर सेल्फी घेण्याव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. अखेर मी सेटवर पोहचले आणि शूटिंगही केले. खूप उशीरा पोहचले."

धनश्री कडगावकर पोस्ट

"नेहमी मी अशा परिस्थितीकडे बाहेरून पाहणाऱ्यांच्या बाजूला असायचे, म्हणजेच मुसळधार पाऊस, अपघात किंवा दरड कोसळल्यामुळे एक्सप्रेसवेवर झालेली वाहतूक कोंडी यांसारख्या बातम्या पाहणारी... पण काल ​​(६ जुलै २०२६) मी स्वतःच त्या परिस्थितीचा एक भाग बनले होते. अशा प्रकारे अडकून पडणे अत्यंत थकवणारे आणि वैताग आणणारे होते. त्यावेळी मला मासिक पाळी सुरू होती; मला वॉशरूमला जायची तीव्र इच्छा होती, पण मी जाऊ शकत नव्हते. मला फूड कोर्टवर जाऊन काहीतरी खावेसे वाटत होते, पण तेही शक्य झाले नाही. गुडघाभर पाणी साचलं होतं , कुठं ओलं व्हा , आजारपण आत्ता परवडणार नाही , कारण खूप शूट लागले आहे. माझा ड्रायव्हर म्हणत होता चला परत पुण्याला जाऊया मॅडम. पण आम्ही अभिनेत्यांना खरोखरच आमच्या वचनबद्धतेची काळजी असते, तसेच टेलिकास्ट जोडला होता. शेवटी हळू हळू पण सुरक्षितपणे पोहोचलो...निसर्गापुढे कोणाचे काहींच चालत नाही पण देवापुढे इतकीच प्रार्थना की, कोणाचे जगणे मुश्किल होईल इतके मोठे आणि भयानक काही होऊ देऊ नको ...सर्वजण सुरक्षित राहा..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS update : मोदी सरकारचा मोठा निर्णय; NPS मध्ये गुंतवणुकीचे २ नवे पर्याय, नेमका काय होणार फायदा?

पावसाळ्यात वारंवार आजारी पडता? मग हे 5 पदार्थ रोजच्या आहारात नक्की ठेवा

Maharashtra News Live Update: आंबेगाव तालुक्यात पावसाचा तडाखा; पूर, रस्ते बंद आणि पुलांवरून पाणी

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

Crime News: १२ वर्षांच्या मुलीची बलात्कार करुन हत्या करणाऱ्या आरोपीचं एन्काऊंटर

SCROLL FOR NEXT