Shreya Maskar
वडापाव बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, पाव, बेसन, हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट, हळद, मोहरी, कढीपत्ता, खाण्याचा सोडा, हिरवी चटणी, सुकी लाल चटणी, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
वडापाव बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि कढीपत्ता टाकून परतून घ्या. यात उकडून मॅश केलेले बटाटे मिक्स करा.
बटाटाच्या भाजीत हळद, चवीनुसार मीठ घालू ३-४ मिनिटे शिजवून घ्या. अशाप्रकारे वडापावची भाजी तयार झाली.
दुसऱ्या बाऊलमध्ये बेसन, मीठ, बेकिंग सोडा आणि पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करून घ्या. मिश्रण जास्त पातळ आणि जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.
आता कढईतमध्ये तेल गरम करा आणि गॅस कमी आचेवर ठेवा. दुसरीकडे मिश्रणाचा थोडासा भाग घेऊन त्याचे गोळे बनवा आणि बेसनाच्या पिठात बुडवा आणि नंतर तेलात सोडा.
वडे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत खरपूस तळून घ्या. पॅनमध्ये थोडे बटर टाकून दोन्ही बाजूंनी पाव फ्राय करा.
शेवटी पावाच्या मधोमध काप करून त्यावर लाल चटणी टाका आणि वडा ठेवा. अशाप्रकारे चटपटीत मुंबई स्पेशल वडापाव तयार झाला.
पावसाळ्यात गरमागरम चहा आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या यांच्यासोबत वडापावचा आस्वाद घ्या.