वैष्णवी राऊत, साम टीव्ही, मुंबई
Asha Bhosle's Dum Maro Dum Song: आशा भोसले, अशा गायिका ज्यांच्या आवाजाचे सगळेच दिवाने आहेत. वयाची 80 गाठूनही त्यांचा आवाज आजही कित्येकांना भूरळ घातलो. त्यांच्या आवाजातील जादूनेच त्यांना अनेक मोठमोठे पुरस्कार मिळवून दिले आहेत, जगभरात ख्याती मिळवून दिलेली आहे. पण तुम्हाला माहिती आहे?
आशा भोसलेंच्या अशाच एका सदाबहार गाण्यावर सरकारने बंदी घातली होती. तेही असं गाणं ज्याने आशा भोसलेंना 'फिल्मफेयर बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगर'चा पुरस्कार मिळवून दिला होता. आणि त्या गाण्यात दिग्गज कलाकारांनी भूमिका बजावली होती. कोणतं होतं ते गाणं? का केलं होतं सरकारने बॅन? काय झालं होतं 53 वर्षांपूर्वी?
आशा भोसलेंचं हे गाणं आहे 'दम मारो दम'. हो, असं गाणं जे आजही कित्येक जणांना वेड लावतं, कित्येक जणांचे ते आवडतं आहे. आजही कुठलीच डिजे नाईट, पार्टी, मेहफिल, गाण्याच्या भेंड्या या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही.
देव आनंद, झीनत अमान आणि मुमताज यांच्या 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटात हे गाणं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आणि त्यातील गाणे तर तुफान गाजले. ‘दम मारो दम’, ‘फूलों का तारों का’, ‘कांची रे कांची रे’ ही गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत.
मात्र यातील ‘दम मारो दम’ हे गाणं काही वेगळंच हिट होतं. हे गाणं लागलं की झीनतची या गाण्यातील वेशभूषा, तिचा तो झोन लगेच डोळ्यांसमोर येतो आणि आपोआप आपण झुलू लागतो. पण हेच गाणं तत्कालीन सरकारने बॅन केलं होतं. त्यावर सरकारने निर्बंध लावले होते.
दिवंगत संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन आणि हे गाणे लिहिणारे आनंद बक्षी यांनी त्यांच्या एका मुलाखतीत तत्कालीन सरकारने या गाण्यावर बंदी घातल्याचा खुलासा केला होता. कारण काय? तर गाण्यात 'दम'सोबत 'भगवान राम' यांचं नाव जोडलं गेलं होतं आणि सरकारचा त्याला आक्षेप होता. त्यामुळे सुरुवातीला आकाशवाणी आणि डीडीने या गाण्यावर बंदी घातली होती.
या गाण्यामुळे देशात 'हिप्पी कल्चर'ला चालना मिळेल, असं भारत सरकारचं म्हणणं होतं. पण गाणं लोकांमध्ये खुप लोकप्रिय झालं होतं. त्यामुळे खूप संघर्षानंतर हे गाणे सेम टू सेम लिरिक्ससह पुन्हा रिलीज करण्यात आलं. तेव्हापासून ते आजतागायच हे गाणं सुपरहिट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.