R. D. Burman Life Unknown Facts: १९६० ते १९९० या तीन दशकात आर. डी. बर्मन यांनी आपल्या दर्जेदार संगीताची छाप भारतीय चित्रपटविश्वात निर्माण केली. आर. डी. बर्मन हे भारतीय संगीत क्षेत्रातील महान संगीतकार होते. आर. डी. बर्मन यांचं टोपण नाव पंचम दा असं होतं. संगीतकार आर. डी. बर्मन यांनी ३०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले. त्यांची गाणी आजही प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहेत.
९०च्या दशकात नवीन संगीतकारांच्या जगात पंचम दा कमजोर पडले होते. त्यांना कामांसाठी काही काळ संघर्ष करावा लागत होता. त्यावेळी नदीन-श्रवण, आनंद मिंलिंद, जतिन-ललित यांची गाणी चालत होती. त्यामुळे ९०च्या दशकात पंचम दा यांना काम मिळणं बंद झाले होते. अंधारात एक आशेचा किरण यावा तसच एक दिवस पंचम दा यांना एक ऑफर मिळाली.
एका नवीन दिग्दर्शकाने त्यांना ऑफर दिली होती. तो दिग्दर्शक दुसरं कोणी नसून विधु विनोद चोप्रा होते. विनोद चोप्रा यांनी त्यांचा चित्रपट ‘१९४२ :लव्ह स्टोरी’ यासाठी पंचम दा यांना विचारले होते. पंचम दा यांनीही लगेचच चित्रपटासाठी होकार दर्शविला. (Entertainment News)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा पंचम दा यांनी त्यांचे पहिले गाणे “कुछ ना कहो, कुछ भी ना कहो” विधूला ऐकवले. तेव्हा त्यांना ते गाणे काही खास आवडले नाही आणि त्यांनी ते गाणे नाकारले. पंचम दा काहीच न बोलता शांत बसले.
यानंतर विधू पंचम दाकडे जाऊन त्यांना म्हणाले, “मी तुझ्या मध्ये असलेल्या व्यक्तीमध्ये चांगलं संगीत शोधत आहे. आणि मला माहित आहे की, ते फक्त तूच देऊ शकतोस.” त्यांच्या मागे वडिल सचिन देव बर्मन यांचा फोटो होता. त्यांचा फोटो पाहून पंचम खूप भावूक झाले. त्यांनी विधूकडे एक आठवड्याची मागणी केली. यावर विधू म्हणाला एका वर्षाचा वेळ घे पण मला फक्त गाण करून दे. (Bollywood)
त्यानंतर आठवडा कसा निघून गेला कळलंच नाही. विधूने त्यांच्या गाण्यासाठी पुन्हा पंचम दा यांच्याकडे जाऊन त्यांच्या गाण्याबद्दल विचारले, त्यांनी आणखी एक आठवड्याचा वेळ मागितला आणि त्यांच्या गाण्याची कॅसेट विधूला दिली आणि म्हणाले की, विधू, यात एस. डी. बर्मन यांचे गाणे आहेत. ते ऐका आणि मला आणखी १ आठवड्याचा वेळ द्या. त्यानंतर आठवडाभरानंतर तो पुन्हा त्यांच्या घरी पोहोचला आणि पाहिलं की पंचम त्याच्या सर्व नातेवाईकांसोबत बसला होता. विधू काही बोलण्यापूर्वी पंचम दा म्हणाले, ‘विधू बस आणि ही धून ऐक.’
दोन आठवड्यांनंतर, पंचम दा यांनी “कुछ ना कहो, कुछ भी ना कहो” गाण्याची पहिली झलक ऐकवताच विधू खूप आनंदी आला आणि हसत म्हणाला, “वा! पंचम दा तू खूप छान काम केलंय, मला जे पाहिजे होते ते तू केलस.” मध्येच विधूला थांबवत पंचम दा म्हणतात, “अजून सुरुवातही झालेली नाही.” यानंतर पंचम दांनी विधू विनोद चोप्राला चित्रपटातील सर्व गाणी एक एक करून दिली. ज्यामुळे विधू आश्चर्यचकित झाला.
वाईट या गोष्टीच वाटतं की, ‘१९४२ :ए लव्ह स्टोरी’ चित्रपट हा पंचम दाचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच ४ जानेवारी १९९४ ला त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘१९४२ :ए लव्ह स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा हिट ठरला. चित्रपटाच्या गाण्यांनी चित्रपट जास्त हिट झाला. पंचम दा यांच्या चित्रपटातील अनेक गाणी प्रेक्षकांच्या आजही ओठांवर रूळलेले आहेत. पंचम दा आज आपल्यासोबत नसले तरी त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून नेहमीच ते प्रेक्षकांमध्ये जिवंत असतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.