Government Banned Offensive Sites: केंद्र सरकारची मोठी कारवाई; 18 OTT प्लॅटफॉर्म, 19 वेबसाईट्स, 10 अ‍ॅप्सवर घातली बंदी

Offensive Sites, OTT, Apps Banned By Central Government: केंद्र सरकारने पुन्हा एकदा अश्लील वेबसाईट्सवर बंदी घातली आहे. यामध्ये १८ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, १९ वेबसाईट्स, १० अॅप्स आणि ५७ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा यात समावेश आहे.
Central Government Banned Offensive Sites, 10 Apps, 18 OTT Platforms
Central Government Banned Offensive Sites, 10 Apps, 18 OTT PlatformsSaam tv
Published On

OTT Platform And Sites Banned:

केंद्र सरकारने पुन्हा एकदा अश्लील वेबसाईट्सवर बंदी घातली आहे. यामध्ये १८ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, १९ वेबसाईट्स, १० अॅप्स आणि ५७ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा यात समावेश आहे.

याबाबात मोठी कारवाई केली असून या साईट्सवर बंदी घालण्यात आली आहे. विविध माध्यमातून अश्लील आणि असभ्य गोष्टी दाखवण्यात आल्या. त्यामुळे यावर केंद्र सरकारने कारवाई (Complaint) केली.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी अश्लीलता, असभ्यता आणि गैरवर्तन प्रकार वाढवण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर जबाबदारीवर वारंवार जोर दिला आहे. तसेच त्यांनी सांगितले की, १२ मार्चला अश्लील आणि असभ्य कंटेंट टाकल्यामुळे १८ OTT प्लॅटफॉर्म काढून टाकण्यात आले आहेत.

Central Government Banned Offensive Sites, 10 Apps, 18 OTT Platforms
VI चा भन्नाट रिचार्ज! ६ महिने मनोरंजन होणार जबरदस्त, अनलिमिटेड कॉलिंग डेटासह २०० टीव्ही चॅनेल्स मिळणार फ्री

माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या तरतुदीनुसार भारत सरकारच्या इतर मंत्रालये/विभाग आणि मीडिया आणि मनोरंजन, महिलांचे हक्क आणि बाल हक्क या क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा करुन यावर निर्णय घेण्यात आला.

1. कोणत्या अॅप्सवर बंदी

ड्रीम्स फिल्म्स, नियॉन एक्स व्हीआईपी, मूड एक्स, वूवी, बेशर्म्स, मोजफ्लिक्स, येस्मा, हंटर्स, हॉट शॉट्स व्हीआईपी, अनकट अड्डा, रॅबिट, फूजी, ट्राई फ्लिक्स, एक्ट्रामूड, चीकूफ्लिक्स, एक्स प्राइम, नियूफ्लिक्स आणि प्राइम प्ले यांसारख्या अॅप्सवर बंदी (Banned) घालण्यात आली आहे.

Central Government Banned Offensive Sites, 10 Apps, 18 OTT Platforms
५० इंचाचा Smart Tv खरेदी करा ३० हजारात, या मॉडेलवर मिळतोय जबरदस्त Discount

ब्लॉक केलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये Besharams, Hunters, Dream Films, MoodX, NeonX, XtraMood आणि यांसारख्या इतर अश्लील साइट्सचा समावेश आहे. या साइट्स लैंगिकदृष्ट्या चुकीचा कंटेंट तयार करण्यात गुंतलेल्या आहे. यामध्ये होस्ट केलेल्या एक कंटेंटमध्ये अश्लील, असभ्य आणि स्त्रियांना अपमानास्पद वाटेल असे चित्र रेखाटले होते. तसेच यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संबंध, अनैतिक कौटुंबिक संबंध आणि लैगिंक कृत्यांचे चित्रण केले होते. त्यामुळे यावर कारवाई करण्यात आली असे MIB ने सांगितले आहे.

एमआयबीने सांगितले की, एक अॅप हे १० दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड आहे. तर दोन अॅप्स हे गुगल प्ले स्टोअरवर ५ दशलक्षाहून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले. ब्लॉक केलेल्या दहा अॅप्सपैकी सात गुगल प्ले स्टोअरवर होते तर तीन अॅपलच्या अॅप स्टोअरवर अश्लील कंटेंटमुळे यावर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com