Rhea Chakraborty in HIBOX Scam : अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. हायबॉक्स अॅप संबंधित ५०० कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला नोटीस धाडण्यात आली आहे. या अॅपच्या जाहिरातीतून लोकांना गुंतवणूक करण्याचं आवाहन केल्याचा रियावर आरोप आहे.
दिल्ली पोलिसांनी HIBOX अॅप घोटाळा प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला नोटीस धाडण्यात आली आहे. रियावर जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना गुंतकवणूक करण्याचा आवाहन केल्याचा आरोप आहे. हा एकूण ५०० कोटींचा घोटाळा असल्याचं बोललं जात आहे. या घोटाळा प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सिवाराम अटक केली आहे.
सिवारामने नोव्हेंबर २०१६ साली सवरुल्ला एक्स्प्रेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनीची स्थापना केली होती. यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये हायबॉक्स अॅप लाँच केला होता. या अॅपच्या माध्यमातून ३० हजार लोकांची फसवणूक करण्यात आली होती. या घोटाळ्यात अनेक बडे लोक आणि हाय-फ्रोफाइल युट्यूबर्सचही नाव समोर येत आहेत.
हायबॉक्स अॅप एक गुंतणूक योजना म्हणून लोकांसमोर आणली. या अॅपच्या माध्यमातून अनेकांना गुंतवणूक करण्यास सांगितलं होतं. या अॅपच्या माध्यमातून एक ते पाच टक्के व्याज देणार असल्याचा दावा करण्यात आला होता. या अॅपच्या माध्यमातून महिन्याला ३० ते ९० टक्क्यापर्यंत रिटर्न देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. सुरुवातीला या अॅपच्या माध्यमातून रिटर्न देण्यात आलं. पुढे जुलै २०२४ साली काही तांत्रिक अडचणी आणि कायदेशीर बंधनामुळे गुंतवणूकदारांचे रिटर्न थांबवण्यात आले होते. त्यानंतर अनेक युजर्सने तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणात रिया चक्रवर्तीसहित कॉमेडियन भारती सिंह, युट्यूबर एल्विश यादव, लक्ष्य चौधरी, अभिषेक मल्हान सारख्या बड्या कलाकारांची नावे देखील समोर आली आहेत. या घोटाळ्याशी संबंधित कलाकारांना नोटीस पाठवून पोलीस चौकशीसाठी बोलवण्यात येत आहे. याच प्रकरणात रिया चक्रवर्तीला देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.